Doctor Couple Donates Organs Of Son: बाईक अपघातात एकुलता एक मुलगा गेला, पण कुटुंबाच्या एका निर्णयानं 11 जणांचं आयुष्य बदललं

Palghar Organ Donate News: या तरुणाच्या मृत्यूनंतर त्यांच्या डॉक्टर आई-वडिलांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला.
Doctor Couple Donates Organs Of Son
Doctor Couple Donates Organs Of SonSaam Tv News

Palghar News: पालघरमधील (Palghar) एका तरुणाचा अपघातात (Boy Death In Accident) दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर या तरुणाने अशी कामगिरी केली आहे की ती आयुष्यभर सर्वांच्या लक्षात राहिल. या तरुणाच्या मृत्यूनंतर त्यांच्या डॉक्टर आई-वडिलांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या एका निर्णयामुळे 11 जणांना जीवनदान मिळाले आहे. या डॉक्टर दाम्पत्यांच्या (Doctor Couple) या निर्णयाचे सर्वस्तरावरुन कौतुक होत आहे.

Doctor Couple Donates Organs Of Son
Kalyan Crime News: काळा तलाव परिसरात तुफान राडा; अल्पवयीन मुलांनी केले चाकूने वार, थरारक घटनेचा व्हिडिओ VIRAL

मिळालेल्या माहितीनुसार, पालघरमध्ये राहणाऱ्या साकेत दंडवते या 30 वर्षीय तरुणाचा अपघातामध्ये मृत्यू झाला. शुक्रवारी बंगळुरुनजीक अपघातामध्ये साकेतचा दुर्दैवी मृत्यू झाला. साकेतच्या मृत्यूनंतर त्याचे वडील आइएमएचे विरार अध्यक्ष डॉक्टर विनीत दंडवते आणि आई डॉक्टर सुमेधा दंडवते यांनी मोठा निर्णय घेतला. मुलाच्या मृत्यूनंतर या डॉक्टर दाम्पत्यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला.

डॉक्टर दंडवते दाम्पत्यांच्या एका निर्णयामुळे अकरा जणांचे आयुष्य बदलले आहे. आपल्या मुलाच्या मृत्यूनंतरही त्याला जिवंत ठेवण्यासाठी या डॉक्टर दाम्पत्यांनी अवयवदानाचा हा निर्णय घेतला. साकेतचे पाच महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. त्याच्या निधनामुळे त्यांच्या पत्नीलाही मोठा धक्का बसला. साकेतच्या पत्नीने देखील अवयवदानासाठी संमती दिली. दंडवते कुटुंबीयांवर मुलाच्या मृत्यूमुळे दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांनी घेतलेला हा निर्णय खूपच प्रेरणादायी आहे.

Doctor Couple Donates Organs Of Son
Nagin Dance Viral Video: आजीपुढं नातीसुद्धा फिक्या, जबरदस्त 'नागिन डान्स'ने तरुणांना लाजवलं

महाराष्ट्र इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अवयवदान समितीचे प्रमुख डॉ. कदम यांनी सांगितले की, 'साकेतचे आई-वडील डॉक्टर विनीत आणि डॉक्टर सुमेधा यांनी त्यांच्या मृत मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. देशामध्ये रक्तदानाबाबत चांगली जनजागृती आहे. तशीच जनजागृती अवयवदानाबाबत होण्याची गरज आहे.'

देशात अपघातामध्ये मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. अशामध्ये मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला तर त्यामुळे अनेकांचा जीव वाचण्यास मदत होते. त्यामुळे अवयवदानाला प्रोत्साहन मिळावे यासाठी अनेक कुटुंबीय पुढे येत असल्याचे दिसून येत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com