पुरंदरमध्ये घडले पंढरीचे दर्शन, बालवारकऱ्यांनी काढली पालखी

पुरंदरमध्ये घडले पंढरीचे दर्शन, बालवारकऱ्यांनी काढली पालखी
पुरंदर तालुक्यातील वाल्हे गावातील अंगणवाडीतील चिमुकल्यांनी काढलेला पालखी सोहळा.

बारामती ः विठ्ठल.. विठ्ठल.. गजरी अवघी दुमदुमली पंढरी... असा जयघोष करीत पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील अंगणवाडीतील चिमुकल्यांनी ग्रामस्थांना पंढरीचे दर्शन घडवले. कोरोनामुळे वारकऱ्यांना प्रत्यक्ष वारीत सहभागी होता येत नाही. मात्र, या वारीचा अनुभव मुलांसह पालकांना घेता यावा यासाठी पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते.

या दिंडी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी विठ्ठल रूक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई आदी विविध संतांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. विठोबा-रूक्मिणी झालेल्या विद्यार्थ्यांना पाहून ग्रामस्थांना प्रत्यक्ष पंढरीचे दर्शन घडले. Palkhi ceremony for children in Purandar

पुरंदर तालुक्यातील वाल्हे गावातील अंगणवाडीतील चिमुकल्यांनी काढलेला पालखी सोहळा.
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार?

डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन साड्या नेसलेल्या विद्यार्थिनी, फुलांची सुशोभित केलेली पालखी, बाजूने भालदार, चोपदार पालखी पुढे-मागे भगव्या पताका, गळ्यात टाळ कपाळी गंध भजनात दंग झालेले वारकरी सर्वांनाच आकर्षित करीत होते. बालवारकऱ्यांनी दिंडीमधील सोहळ्यात विविध प्रकारचे खेळ, फेर, फुगडीने वेगळाच रंग भरला. Palkhi ceremony for children in Purandar

पालखीचे आकर्षण सर्वांनाच असते. त्याची अनुभूती अंगणवाडीतील मुलांनी आज घेतली. शाळेच्या प्रांगणामध्ये ग्रामप्रदक्षिणा दरम्यान 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोष करीत पर्यावरणाची गीते गात मुलांनी हातात फलक घेऊन पारंपारिक खेळ व फुगड्या खेळत पर्यावरण जनजागृतीच्या घोषणा दिल्या. चिमुकल्यांच्या वारीदरम्यान ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून वारीचे स्वागत केले.

Edited By - Ashok Nimbalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com