पंचगंगा पुन्हा धोक्याच्या पातळीवर...सतर्कतेचा इशारा
पंचगंगा पुन्हा धोक्याच्या पातळीवर...सतर्कतेचा इशाराSaam Tv

पंचगंगा पुन्हा धोक्याच्या पातळीवर...सतर्कतेचा इशारा

कोल्हापूर मधील पंचगंगा नदीचे पात्र ओव्हर फ्लो झाले आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर Kolhapur मधील पंचगंगा Panchganga नदीचे पात्र ओव्हर फ्लो झाले आहे. या नदीचे पाणी परत एकदा पात्राबाहेर यायला सुरवात झाली आहे. पावसाचा जोर वाढल्या असल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मागील २४ तासांमध्ये नदीची पाणी पातळीमध्ये ३ फुटांनी वाढली आहे.

पुढील २ ते ३ दिवसांत कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट Red alert दिला आहे. नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये district गेल्या काही दिवसांमध्ये जोरदार पाऊस Rain चालू आहे. पश्चिमेकडच्या भागात पावसाचा जोर जास्त प्रमाणात वाढत असल्याने, नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे.

हे देखील पहा-

मागील २४ तासांमध्ये पंचगंगेच्या पाण्यात ३ फुटांनी वाढ झाली आहे. जूनच्या शेवटी जिल्ह्याला चांगलंच पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे पाणलोट क्षेत्रामध्ये चांगलीच वाढ झालेली आहे. सततच्या या पावसाने धरणामधून dam सोडलेले पाण्याने नदीच्या पातळीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. काल रात्रीपासून या भागामध्ये पावसाचा जोर आणखीन वाढला आहे.

पंचगंगा पुन्हा धोक्याच्या पातळीवर...सतर्कतेचा इशारा
हतनूरचे १६ दरवाजे पूर्ण उघडले; तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी सकाळी पंचगंगेत पाणी सोडण्यात आले आहे. राजाराम Rajaram बंधाऱ्याची २८ फुट १० इंच इतकी वाढली आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने, सध्या याची पातळी ३९ फूट आणि धोका पातळी ४३ फूट आहे. जिल्ह्यामधील एकूण १७ बंधारे पाण्याखाली गेली आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com