Lockdown हटवा : महाबळेश्वर पाठाेपाठ पाचगणीकर एकवटले

Lockdown हटवा : महाबळेश्वर पाठाेपाठ पाचगणीकर एकवटले
panchgani traders demands unlock satara

सातारा : सातारा जिल्ह्यातील लाॅकडाउन हटवा य़ा मागणीसाठी सातारा, क-हाड, वाई, महाबळेश्वर पाठाेपाठ आता पाचगणीतील व्यापारी panchgani traders आक्रमक झाले आहेत. आज (साेमवार) पाचगणीमधील व्यापा-यांनी लाॅकडाउन हटवा या मागणीचा विचार व्हावा यासाठी बाजारपेठेत रस्त्याच्या कडेला उभे राहून मूक आंदाेलन केले. (panchgani-traders-demands-unlock-satara-marathi-news)

सातारा जिल्ह्यात लॉकडाउनचे नियम कडक केल्या नंतर जिल्ह्यातील विविध भागांतील व्यापारी वर्ग आक्रमक झाला आहे. सातारा, वाई येथील व्यापाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरून प्रशासनाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला महाबळेश्वरातील व्यापा-यांनी दुकाने उघडण्याचा निर्धार करुन प्रशासनास एकी दाखविली हाेती. वाढत्या रुग्ण संख्येमुळे पर्यटकांनी पर्यटनस्थळांवर गर्दी करु नये असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नुकेतच केले. आता पाचगणी मधील व्यापाऱ्यांनी सुद्धा पाचगणीच्या मुख्य रस्त्यावर उतरून हातात निषेधाचे फलक घेऊन प्रशासनाच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे.

panchgani traders demands unlock satara
ठरलं तर : हे हाेणार कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष

पाचगणी महाबळेश्वरमधील रोजगार हा पूर्णपणे येथील पर्यटनावर अवलंबून आहे. गेल्या दीड वर्षांपासून येथील व्यवसाय पुर्णतः ठप्प झाले आहेत. अनेकांचा रोजगार बुडाला आहे. बहुतांश व्यवसाय पूर्णपणे बंद पडले आहेत. या व्यवसायिकांवर आता उपासमारीचे संकट कोसळले आहे. त्यामुळे शासनाने सर्व दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करीत येथील व्यावसायिकांनी आज (साेमवार) सर्व दुकाने बंद ठेवली. सर्व व्यापा-यांनी दुकानाच्या बाहेर मागण्यांचे आणि प्रशासनाच्या लाॅकडाउनच्या निर्णयाचे निषेधाचे फलक हातात घेऊन मूक आंदाेलन केले.

Edited By : Siddharth Latkar

Related Stories

No stories found.