Ambernath : बैलगाडा शर्यतीच्या वादातून मोठा राडा; अंबरनाथमध्ये दिवसाढवळ्या अंधाधुंद गोळीबार

अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीच्या वादातून अंधाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.
 Ambernath crime news
Ambernath crime news saam tv

Ambernath crime news : अंबरनाथमधून मोठं वृत्त समोर येत आहे. अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीच्या वादातून अंधाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीच्या वादातून अंधाधुंद गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती हाती आहे. अंबरनाथ एमआयडीसीतील सुदामा हॉटेलजवळ गोळीबाराची घटना घडली आहे . या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे. (Latest Marathi News)

 Ambernath crime news
Dhule: मिरचीची पूड डोळ्यात टाकून चोरट्यांनी २४ लाख लुटले

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथमध्ये (Ambernath) बैलगाडा शर्यतीच्या वादातून अंधाधुंद गोळीबार झाल्याीच घटना घडली आहे. पनवेलमधील (Panvel) पंढरीशेठ फडके आणि कल्याणचे राहुल पाटील यांच्यात वाद झाल्याने गोळीबाराची घटना घडली आहे. फटके गटाने पाटील गटावर अंधाधुंद गोळीबार केला आहे. अंबरनाथ एमआयडीसीतील सुदामा हॉटेलजवळ गोळीबाराची घटना घडली आहे. १५ ते २० गोळ्या झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

 Ambernath crime news
औरंगाबादेत चाललंय काय ? व्हिडिओ रीलवरून झालेल्या वादातून तरुणांचा मैत्रिणीच्या आईवर जीवघेणा हल्ला

अंबरनाथ एमआयडीसीतील सुदामा हॉटेलजवळ गोळीबार झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दोन गटात गोळीबार झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. घटनेनंतर शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे. तर राहुल पाटील यांचे शेकडो समर्थक घटनास्थळी पोहोचले आहेत.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com