Pandharpur Accident News: देवदर्शनानंतर घरी निघाले, वाटेत काळाचा घाला; ३ भाविक जागीच ठार, ७ जखमी

Accident News: या अपघातात ३ भाविक ठार झाले असून ७ जण गंभीर जखमी झाले आहे.
Pandharpur Accident News
Pandharpur Accident NewsSaam TV

संजय जाधव

Shegaon Accident News: पंढरपूर येथून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. विठोबाच्या दर्शनासाठी गेलेल्या शेगावातील भाविकांच्या वाहनाला परतत असताना भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३ भाविक ठार झाले असून ७ जण गंभीर जखमी झाले आहे. (Latest Accident News)

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील शेगाव जवळच हा अपघात घडला आहे. आज सकाळी सहाच्या सुमारास शेगाव शहराच्या प्रवेशद्वाराजवळ भाविक आपल्या वाहनाने आले. यावेळी त्यांची चारचाकी कार शहराच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या स्वागत फलकाच्या पिलरवर धडकली.

Pandharpur Accident News
Pune Accident News: पुण्यातील उंड्री चौकात भीषण अपघात, भरधाव गाडीची 5-6 गाड्यांना जोरदार धडक; दोघांचा मृत्यू

या अपघातामध्ये ३ भाविक जागीच ठार तर 7 भावीक गंभीर जखमी झाले आहेत. नागरिकांच्या मदतीने सर्व भाविकांना शेगावच्या सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालायात दाखल करण्यात आले. यानंतर गंभीर जखमी असलेल्या भाविकांना पुढील उपचारार्थ अकोल्यात हलवण्यात आले आहे. चालकाला झोप लागल्याने हा अपघात झालायचे समजते. रात्रीपासून हा प्रवास सुरु होता आणि अगदी त्यांच्या घरापासून फक्त २ किलो मीटर अंतर बाकी होते.

भरधाव गाडीची 5-6 गाड्यांना जोरदार धडक; दोघांचा मृत्यू

रविवारी रात्री पुण्यातील उंड्री चौकात भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल झालेल्या गाडीने ५ ते ६ गाड्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला आहे तर चार जण जखमी झाले आहेत.

Pandharpur Accident News
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरुच, भरधाव कारचा टायर फुटून ट्रकला धडक; चौघे जखमी

तीव्र उतारावर हा अपघात झाला आहे. मोहम्मदवाडी परिसरात अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी पाहायल मिळत आहे. कोंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघातातील जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com