एसटी कर्मचाऱ्यांनी‌ टोकाची भूमिका घेऊ नये- अजित पवार

एसटी कर्मचाऱ्यांनी‌ टोकाची भूमिका घेऊ नये असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूर मध्ये केलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी‌ टोकाची भूमिका घेऊ नये- अजित पवार
एसटी कर्मचाऱ्यांनी‌ टोकाची भूमिका घेऊ नये- अजित पवारभारत नागणे

भारत नागणे

पंढरपूर: एसटी कर्मचाऱ्यांनी‌ टोकाची भूमिका घेऊ नये असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूर मध्ये केलं आहे. एसटी कामगारांनी टोकाची भूमिका घेऊ नये. दोन पावले मागे घ्यावीत असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पंढरपुरात केले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार Sunetra Pawar यांच्या हस्ते सोमवारी (ता. 15) कार्तिकी एकादशीची विठ्ठल-रुक्‍मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली आहे. महापूजेनंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी कोरोना लसीकरणाबाबत Corona Vaccine अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेण्याची सूचनाही केली.

हे देखील पहा-

यावेळी बोलत असताना अजित पवार म्हणाले, गेल्या ६० वर्षात कधीच एसटीचे सरकार मध्ये विलीनीकरण करावे असा मुद्दा समोर आला नव्हता. मात्र विरोधकांकडून मुद्दामुन हा प्रश्न चिघळवला जात आहे. राज्यातील विरोधी पक्ष विविध मुद्दे काढून राज्याला मुद्दाम अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. एसटी विलनीकरण केले तर राज्यातील सर्व महामंडळाचे कर्मचारी देखील अशी मागणी करतील असे सांगत अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका , कोतवाल, पोलीस पाटील हे देखील मागणी करू शकतात असे पवार यांनी सांगितले.

एसटी कर्मचाऱ्यांनी‌ टोकाची भूमिका घेऊ नये- अजित पवार
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे राज ठाकरेंनी घेतले अंत्यदर्शन

राज्य सध्या तरी पेट्रोल डिझेल वरील कर कमी नाही;

सध्या तरी राज्याला उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. अजून आर्थिक घडी नीट बसलेली नसून पगार ,पेन्शन आणि दैनंदिन खर्च तसाच असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या वरील राज्यांचा कर कमी होण्याची शक्यता नाही. तरीही येत्या अधिवेशनापूर्वी कर कमी करायचे असतील तर किती आर्थिक नुकसान सोसावे लागेल ते पाहून निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

यावेळी रावसाहेब दानवे यांनी पेट्रोल डिझेल दर हे अमेरिका सारखे देश ठरवतात या वक्तव्याचे समर्थन केले.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com