
पंढपूर : पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्यानं काही दिवसापूर्वी कर्जाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका शेतकऱ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या घटनेनं पंढरपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. सावकाराच्या जाचाला कंटाळून पंढरपूर जवळच्या वाखरी येथील शेतकऱ्यानं (Farmer) विष पिऊन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. परमेश्वर पोरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. सदर शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर पंढरपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Pandharpur Latest Marathi News )
हे देखील पाहा -
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील एका शेतकऱ्यानं विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकरी परमेश्वरी पोरे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सदर प्रकरणात सावकारानं शेतकऱ्याचं परस्पर शेत विकलं होतं. त्यामुळे शेतकरी परमेश्वर पोरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेने पंढरपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. सदर शेतकऱ्याचा आत्महत्या करत असल्याचा लाईव व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरला झाला आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या त्यांच्यावर पंढरपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची नोंद पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
दरम्यान, पंढरपूरमधील एका तरुण शेतकऱ्यानं काही दिवसापूर्वी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे पंढरपूरमध्ये एकच खळबळ उडाली होती. 'शेतकऱ्याच्या पोटी पुन्हा जन्माला येणार नाही, सरकार शेतकऱ्यासाठी काही करत नाही', असे म्हणत वैफल्यग्रस्त झालेल्या एका तरूण शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते.
Edited By - Vishal Gangurde
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.