Nira River News: शेतकऱ्यांनी निरेचा कालवा फोडला

शेतक-यांनी हे कृत्य का केले याचा तपास सुरु आहे.
Pandharpur
Pandharpursaam tv

Pandharpur News: पंढरपूर जिल्ह्यात निरेचे (nira river) पाणी काही दिवसांंपासून पेटल्याचे चित्र आहे. त्याचे पडसाद नुकतेच उमटले. काही शेतकऱ्यांनी (farmers) निरेचा कालवा फोडल्याचा प्रकार घडला आहे. परिणामी दोन शेतकऱ्यांवर पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात (pandhar gramin police station) गुन्हाची नाेंद झाली आहे.

Pandharpur
Pandharpur : पाणी आमच्या हक्काचं... नीरा कालव्याचे पाणी शेतक-यांनी वळविले; NCP चा अधिका-यांना इशारा

पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील पळशी येथील नीरेचा कालवा दाेन शेतक-यांनी फोडला. त्यामुळे नुकसान केल्याप्रकरणी शेतकऱ्यांविरोधात पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मधुकर कुंडलिक महानवर व विजय सत्यवान राजमाने अशी कालवा फोडणाऱ्या शेतकऱ्यांची नावे असल्याची माहिती पाेलिस ठाण्यात देण्यात आली आहे. या‌ प्रकरणी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता नागेश ताटी यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली हाेती.

Pandharpur
Satara : प्रेमापाेटी विवाहितेला संपविलं, लव्हरची आत्महत्या

संबंधित शेतकऱ्यांनी लोणारवाडी व पळसीकडे जाणारा जुना पारंपारिक कालवा बुजून व कालव्याचे नुकसान करून अन्य बाजूने कालवा काढला आहे. यामुळे पाटबंधारे विभागाचे 35 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com