धरिला पंढरीचा चोर! कार्तिकी यात्रेत चोरी करणाऱ्या २१ चोरांची टोळी गजाआड

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची मोठी कामगिरी!
धरिला पंढरीचा चोर! कार्तिकी यात्रेत चोरी करणाऱ्या २१ चोरांची टोळी गजाआड
कार्तिकी यात्रा पंढरपूर भारत नागणे

पंढरपूर : कार्तिकी यात्रेच्या‌ निमित्ताने पंढरीत सोमवारी लाखो भाविक विठ्ठल दर्शनासाठी आले होते. यात्रेत हौशे, नवशे, गवशे जसे येतात तसे चोर देखील मोठ्या‌ संख्येने‌ आले होते. या दरम्यान चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांचे‌‌ एक खास पथक ही तयार करण्यात आले होते. यामध्ये वारकरी वेशातील पोलिस या चोरट्यांवर नजर ठेवून होते.

हे देखील पहा :

वारीमध्ये गर्दीत वारकऱ्यांचा खिसा साफ करणाऱ्या, मोबाईल व महिलांची पर्स लंपास करणाऱ्या तब्बल २१ चोरांच्या‌ मुसक्या‌ आवळण्यात पंढरपूर पोलिसांना‌ यश आले आहे. चंद्रभागा नदी, संत नामदेव‌ पायरी, दर्शनबारी आदी गर्दीच्या ठिकाणी वारकऱ्यांच्या वेशातील पोलिसांनी‌ मोठ्या शिताफीने चोरट्यांना पकडून‌ त्यांच्यावर कारवाई‌ केली आहे.

कार्तिकी यात्रा पंढरपूर
प्रोटोकॉल बाजूला ठेवून केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड यांनी विमानात केले प्रवाशावर उपचार!

यामध्ये काही महिला चोरांचा ही समावेश आहे. या‌ चोरांकडून‌ पोलिसांनी‌ सुमारे 45 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल व‌ काही रोख रक्कम ही हस्तगत केली‌ आहे. चोरटयांकडून आणखी काही चोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आता पर्यंत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात चोरीच्या दोन तक्रारी ‌दाखल झाल्या आहेत. वारकऱ्यांनी चोरीच्या घटनेबाबत पोलिस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com