कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने अजित पवारांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने अजित पवारांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजाSaam Tv

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने अजित पवारांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा

"जगावर आणि देशावर आलेले कोरोनाचे संकट लवकर दूर होऊ दे, महाराष्ट्रातील जनतेला सुख समाधान आणि शांती लाभू दे" असं साकडं विठ्ठल रुक्मिणी चरणी घातल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापूजेनंतर सांगितले.

पंढरपूर - तब्बल दोन वर्षानंतर कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने पंढरी नगरी विठु नामाच्या जय घोणांनी दुमदुमून गेली आहे. दरम्यान आज पहाटे अडीच वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी मानाचा वारकरी म्हणून नांदेड जिल्ह्यातील निळ गावच्या कोंडीबा टोणगे व प्रयागबाई टोगणे या वारकरी दाम्पत्याला महापूजेला बसण्याचा मान मिळाला.

हे देखील पहा -

"जगावर आणि देशावर आलेले कोरोनाचे संकट लवकर दूर होऊ दे, महाराष्ट्रातील जनतेला सुख समाधान आणि शांती लाभू दे" असं साकडं विठ्ठल रुक्मिणी चरणी घातल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापूजेनंतर सांगितले.त्यांच्यासमवेत पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आदी उपस्थित होते.

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने अजित पवारांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा
शिवरायांवर 12000 हून अधिक भाषणांसह, बाबासाहेब पुरंदरेंच्या जीवनातील खास गोष्टी

कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने अवघी पंढरी नगरी विठू नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे. आज पहाटेपासूनच वारकऱ्यांनी चंद्रभागा स्नानासाठी आणि विठ्ठल दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. कोरोनामुळे आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे भाविकांची संख्या रोडावली आहे. आज कार्तिक एकादशीच्या निमित्ताने पंढरीत सुमारे दोन‌ लाख‌ भाविक‌ पंढरीत आले आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com