Illegal Moneylenders: दोन लाखांच्या मुद्दलावर 32 लाख व्याजाची वसुली; खासगी सावकारावर गुन्हा दाखल

दोन लाखांच्या मुद्दलावर 32 लाख व्याजाची वसुली; खासगी सावकारावर गुन्हा दाखल
Pandharpur News
Pandharpur NewsSaam tv

पंढरपूर : दोन लाख रूपयांच्या मुद्दलावर चक्क 32 लाखांचे पठाणी पध्दतीने व्याज वसूल करणाऱ्या पंढरपुरातील एका खासगी सावकारासह सहा जणांवर सांगोला पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश गायकवाड असे पंढरपुरात (Pandharpur) राहणाऱ्या खासगी सावकाराचे नाव आहे. (Pandharpur News Police Case against a private lender)

Pandharpur News
Bus Accident: धावत्या बसचे मागचे चाक निखळले; प्रवासी बचावले

सांगोला (Sangola) तालुक्यातील जवळा येथील सचिन आमले यांनी 2016 मध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी खासगी सावकार महेश‌ गायकवाड यांच्याकडून १० टक्के व्याज दराने दोन लाख रुपये घेतले होते. दरम्यान फिर्यादी सचिन आमले याने आरोपी सावकाराला 2018 पर्यंत व्याजाचे 5 लाख 50 हजार रूपये दिले.

वडीलांना नोकरीवरून कमी करण्याची दमदाटी

यानंतरही आणखी रक्कम देण्यासाठी आरोपीने फिर्यादीचे वडील पांडुरंग आमले यांना नोकरीवरून कमी करू अशी भिती घालून व दमदाटी करून वेळोवेळी 27 लाख रूपये उकळले. त्यानंतरही आरोपीने आणखी एक लाख रुपये देण्याची मागणी करत फिर्यादीसह आई वडीलांना दमदाटी केली. म्हणून फिर्यादी सचिन आमले यांनी सावकार महेश गायकवाड, रामचंद्र पाटोळे, अमोल जाधव यांच्यासह सहा जणांविरोधात सावकारी प्रतिबंधक कायद्यानुसार सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com