Pandharpur: धक्कादायक! शिक्षण विभागातील कर्मचाऱ्याला मुख्याध्यापकाची बेदम मारहाण; पोलिसात गुन्हा दाखल

या प्रकरणात भटुंबरे (ता.पंढरपूर) येथील मुख्याध्यापक ज्योतीराम रोकडे यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pandharpur News
Pandharpur NewsSaamTv

Pandharpur News: पंढरपूरच्या (Pandharpur) गटशिक्षणाधिकारी कार्यालयात ऐन रंगमंचीच्या दिवशी एका मुख्याध्यापकाने कार्यालयातील कर्मचाऱ्यांला जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात भटुंबरे (ता.पंढरपूर) येथील मुख्याध्यापक ज्योतीराम रोकडे यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जखमी कर्मचाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Pandharpur News
Chandrapur: मोठी बातमी! भाजप आमदार बंटी भांगडिया यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल; नेमके काय आहे प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील संजय माधव बरमादे हे सुट्टी असताना ही कार्यालयीन काम करत होते. यावेळी दुपारी भटुंबरे गावातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक ज्योतीराम रोकडे यांनी कार्यालयात येवून बरमादे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप बरमादे यांनी केला आहे.

Pandharpur News
Viral Video: सातासमुद्रापल्याडं थेट रशियात राष्ट्रवादी पुन्हा! 'त्या' व्हायरल व्हिडिओची होतेय तुफान चर्चा; एकदा पाहाच....

दरम्यान, मुख्याध्यापक हे मद्यधुंद अवस्थेत असताना त्यांनी हा हल्ला केला असून लाथा बुक्यांनी जबर मारहाण केल्याने त्यांच्या छातीला तसेच डोक्याला मार लागल्याचे संजय माधव बरमादी यांनी आपल्या तक्रारीमध्ये सांगितले आहे. सध्या त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com