Pandharpur: थंडी वाढल्याने विठोबा-रखुमाईस उबदार पोशाख

थंडी वाढल्याने विठोबा-रखुमाईस उबदार पोशाख
Pandharpur
PandharpurSaam Tv

पंढरपूर : शरद ॠतू सुरू झाल्याने परंपरेप्रमाणे देवाच्या पोषाखात बदल करत करण्यात आला आहे. थंडीपासून संरक्षण व्हावे; यासाठी आजपासून (Vitthal Temple) श्रीविठ्ठल व रुक्मिणीस उबदार कपड्याचा पोषाख परिधान करण्यात आला आहे. (Breaking Marathi News)

Pandharpur
Accident News: पीएमटी बस– दुचाकीची धडक; विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

वाढत्या थंडीचा (Winter Season) कडाका सर्वसामान्यांना जाणवू लागला आहे. पंढरपूरच्या (Pandharpur) विठू माऊलीला या थंडीचा कडाका बसू नये; म्हणून विठू माऊलीच्या मूर्तीला उबदार रझई, शाल व कानपट्टीचा पोशाख देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सर्वत्र कडाक्याची थंडी सुरू आहे. यामुळे अनेकजण थंडीपासून संरक्षण व्हावे, यासाठी उबदार कपड्याचा वापर करत आहेत. त्याचप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस थंडी वाजू नये यासाठी मंदिर समितीकडून रजाई, शाल, मफलर व कानपट्टी असा पोशाख परिधान केला आहे.

प्रक्षाळपुजेनंतर पोशाखात बदल

थंडीच्या दिवसात प्रक्षाळपुजेनंतर विठूरायाच्या मूर्तीला हा उबदार पोशाख घालण्यास सुरुवात केली जाते. श्रीविठ्ठल मंदिरात रात्रीच्या वेळी होणारी शेजारती झाल्यानंतर विठूराया झोपी जाण्यापूर्वी मूर्तीच्या डोक्याभोवती एका विशिष्ट पद्धतीने मुंडासे बांधले जाते. त्यानंतर विठू माऊलीच्या कानाला थंडी वाजू नये म्हणून उपरण्याची सुती कानपट्टी मूर्तीच्या कानाला बांधण्यात येते. विठ्ठल मूर्तीला डोक्यापासून पायापर्यंत पांढरा शेला देण्यात येतो. या शेल्यावर उबदार शाल आणि काश्मिरी रजई घातली जाते. विठूरायाच्या मूर्तीला थंडी वाजणार नाही; याची काळजी याद्वारे घेण्यात येते. यानंतर विठ्ठल मूर्तीच्या गळ्यात तुळशीचा हार घातला जातो. मग विठ्ठल मूर्तीची आरती करून विठ्ठलाला निद्रेसाठी तयार केले जाते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com