'अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग' विठुरायाच्या मंदिरात रंगपंचमी उत्साहात

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या सावळ्या विठुरायाच्या मंदिरात देखील आज रंगोत्सव साजरा करण्यात आला.
अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग; विठुरायाच्या मंदिरात रंगपंचमी उत्साहात
अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग; विठुरायाच्या मंदिरात रंगपंचमी उत्साहातSaamTVNews

पंढरपूर : रंगांचा उत्सव असलेला रंगपंचमी (Rangpanchami) सण महाराष्ट्रभर उत्साहात साजरा होत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या सावळ्या विठुरायाच्या मंदिरात देखील आज रंगोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांनी विठुरायाच्या पंढरीत रंगाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा झाला. आज रंगपंचमी निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी (Vitthal-Rukmini) मातेला पांढरा पोशाख आणि पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आले आहे. केशरी, गुलाबी, असे नैसर्गिक रंग विठुरायाला आणि रूक्मिणी मातेला लावून मंदिरात रंगपंचमीचा आनंदत्सव साजरा करण्यात आला.

हे देखील पहा :

श्री विठ्ठल (Vitthal) श्रीकृष्णाचा अवतार असल्याने रंगपंचमी उत्सव मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने मंदिरात साजरा केला जातो. वसंत पंचमी ते रंगपंचमी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेवर दररोज गुलालाची उधळण केली जाते. आज रंगपंचमीच्या शेवटच्या दिवशी मंदिराच्या (Vitthal-Rukmini-Mandir) डफाची पूजा करून नामदेव पायरी पासून मिरवणूक काढून मंदिर प्रदक्षिणा केली.

अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग; विठुरायाच्या मंदिरात रंगपंचमी उत्साहात
ज्या दिवशी माझ्याकडून बीड जिल्ह्याची बदनामी होईल, तो माझा शेवटचा क्षण असेल - पंकजा मुंडे

प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सपत्निक आज श्री विठ्ठलाची पूजा केली. यावेळी प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसिलदार सुशील बेल्हेकर, मुख्य अधिकारी अनिल माळी, पोलिस अधिकारी विक्रम कदम, मंदिर व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी ढोल ताशा वर मंदिरात चांगलाच ठेका धरत रंगपंचमीचा आनंद लुटला.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com