मंत्री पदापासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांचे षडयंत्र; शहाजी बापू पाटलांचा आरोप

विरोधकांच्या बदनामी मुळे माझ्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नाही; शहाजी बापू पाटलांचा पलटवार
Shahaji Bapu Patil
Shahaji Bapu PatilSaam Tv

पंढरपूर - मला मंत्रीपदाचा दूर ठेवण्यासाठी विरोधकांचे हे षडयंत्र सुरू आहे. त्याची सगळी सूत्रे मुंबईतून‌ हालत आहेत. विरोधकांच्या बदनामी मुळे माझ्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नाही, असा पलटवार सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी शिवसेनेवर (Shivsena) केला आहे.

हे देखील पाहा -

सतत शिवसेनेवर टिका करणारे सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात युवा सेना चांगलीच आक्रमक झाली असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. युवा सेनेच्या वतीने काल अकलूजमध्ये (Akluj) आमदार पाटील‌ यांच्या विरोधात आंदोलनही करण्यात आले. शिवाय सोशल मिडियातून पोस्ट व्हायरल करून टिका ही करण्यात आली.

Shahaji Bapu Patil
प्रबोधनकार ते बाळासाहेब ते राजसाहेब, ....आणि 'एक'नाथ साहेब, आमदार राजू पाटील यांचं ट्विट चर्चेत

आमदार पाटील‌ यांच्या पोस्टची सोलापूर जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. काय दारू,काय चकणा.. काय ते 50 खोके.. समंध कसं ओके अशा पोस्ट व्हायरल करून आमदार पाटील यांच्यावर बोचरी टिका केली होती. त्यावर आमदार पाटील यांनी मला बदनाम करण्यासाठी व मंत्री पदापासून वंचित ठेवण्यासाठी विरोधकांनी रचलेलं षडयंत्र असल्याचा आरोप करत, विरोधकांच्या बदनामीमुळे माझ्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नाही. सोशल मीडियातून शिवसेनेची काही टुकार पोरं माझी बदनामी करत आहेत. त्याकडे मी लक्ष देणार नसल्याचे देखील शहाजी बापू पाटील या वेळी म्हणाले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com