Tractor Accident : भयंकर! ऊस तोड कामगारांचा ट्रॅक्टर उजनी कालव्यात कोसळला, ३ महिलांसह २ मुलांचा मृत्यू

पंढरपुरातून अपघाताची एक भयंकर घटना समोर आली आहे. ऊस तोड मजूरांना ऊसाच्या फडात घेवून जात असताना एका ट्रॅक्टरला मोठा अपघात झाला.
 Pandharpur Tractor Accident
Pandharpur Tractor Accident Saam TV

Pandharpur Tractor Accident : पंढरपुरातून अपघाताची एक भयंकर घटना समोर आली आहे. ऊस तोड मजूरांना ऊसाच्या फडात घेवून जात असताना एका ट्रॅक्टरला मोठा अपघात झाला. भरधाव वेगात असलेला ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट उजनी कालव्यात कोसळला. या अपघातात तीन ऊसतोड महिला मजूरांसह दोन‌ लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

 Pandharpur Tractor Accident
Santosh Munde Death : प्रसिद्ध Tik Tok स्टार संतोष मुंडेचा करंट लागून मृत्यू; मन सुन्न करणारी घटना

ही दुर्देवी घटना पंढरपूर जवळच्या करकंब परिसरात मंगळवारी रात्री (13 डिसेंबर) ११ वाजेच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्या मजुरांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघातात जखमी तसेच मृत्युमुखी पडलेले ऊसतोड मजूर हे मध्यप्रदेशातील असल्याची माहिती आहे.

 Pandharpur Tractor Accident
Nashik News : राष्ट्रवादीच्या महिला नेत्यावर जीवघेणा हल्ला; धक्कादायक घटनेनं खळबळ

प्राप्त माहितीनुसार, अपघातग्रस्त मजूर हे मंगळवारी रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टरने ऊसाच्या फडात जात होते. यावेळी ट्रॅक्टर करकंब परिसरात आले असता, चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटलं. आणि ट्रॅक्टर थेट उजनी कालव्यात कोसळला. या भयंकर घटनेत तीन महिलांसह दोन मुलांचा मृत्यु झाला आहे. या घटनेमुळे अपघातातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com