Pandharpur News : शाळेतून घरी परतताना २ विद्यार्थिनीवर काळाचा घाला; वाटेतच मृत्यूने गाठले, पंढरपुरात शोककळा

पंढरपूरमध्ये शाळेतून घरी परतताना दोन विद्यार्थिनीचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
Pandharpur News
Pandharpur NewsSaam Tv

पंढरपूर : पंढरपूरमधून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. पंढरपूरमध्ये शाळेतून घरी परतताना दोन विद्यार्थिनीचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पंढरपूर तालुक्यातील दोन धक्कादायक घटनांमुळे खळबळ उडाली आहे. अक्षरा जमदाडे आणि राधा आवटे असे मृत विद्यार्थिनींचे नाव आहे. (Latest Marathi News)

पंढरपूर (Pandharpur) तालुक्यात करकंब भागात वेगवेगळ्या झालेल्या अपघातात (Accident) दोन शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Pandharpur News
Karad : पुणे - बंगळूर महामार्गावर ट्रॅफिक जॅम; कोल्हापूर, सांगलीहून पुण्यासह मुंबईला जाणा-यांचे हाल

अक्षरा जमदाडे ही भोसे येथील यशवंत विद्यालयात इयत्ता सातवीमध्ये शिकत होती. अक्षरा काल ११ वाजण्याच्या सुमारास तिची शाळा सुटल्यानंतर घरी जात होती. घरी जात असताना ती प्रवास करत असलेल्या पिकअप वाहनाचा दरवाजा उघडला. त्यावेळी दरवाजाचा धक्का लागल्याने बाजूने जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या खाली अक्षरा पडली. यामध्ये अक्षराचा मृत्यू झाला.

Pandharpur News
Nagpur News : २ वर्षांच्या चिमुरड्याचा घराच्या गॅलरीत खेळता खेळता गेला तोल, क्षणात झालं होत्याचं नव्हतं

दुसऱ्या घटनेत दहावीचा पेपर देऊन राधा ही भावासोबत दुचाकीवरून घरी जात होती. त्यावेळी तिच्या अंगावर जळतं झाड पडलं.रस्ताच्या बाजूला असलेलं पेटलेलं झाडं राधाच्या अंगावर पडल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे राधाला तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु रुग्णालयात डॉक्टरांनी राधाला मृत घोषित केले.

ही दुर्दैवी घटना पंढरपुरातील बार्डी-करकंब रोडवर घडली. एकाच दिवशी परिसरातील दोन शाळकरी विद्यार्थींनाचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रस्त्यावरील झाडाला आग कशी लागली, झाडाला कोणी पेटवलं, याबाबत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com