लग्नाचा बस्ता खरेदीला गेली; दुकानदाराने नववधूला प्यायला दिलं केमिकलयुक्त पाणी

लग्नाचा बस्ता खरेदीला गेली; दुकानदाराने नववधूला प्यायला दिलं केमिकलयुक्त पाणी
लग्नाचा बस्ता खरेदीला गेली; दुकानदाराने नववधूला प्यायला दिलं केमिकलयुक्त पाणी
लग्नाचा बस्ता खरेदीला गेली; दुकानदाराने नववधूला प्यायला दिलं केमिकलयुक्त पाणीSaam Tv

पंढरपूर : सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे लग्नाचे कपडे खरेदीसाठी अनेक दुकानांमधून गर्दी होत आहे. अशाच एका कापड दुकानात लग्नाचा बस्ता खरेदीसाठी आलेल्या नववधूवरील संकट थोडक्यात निभावले. (pandharpur news went shopping The shopkeeper gave the bride a drink of chemical water)

लग्नाचा बस्ता खरेदीला गेली; दुकानदाराने नववधूला प्यायला दिलं केमिकलयुक्त पाणी
हंडे घेवून महिला पोहचल्‍या आयुक्‍त कार्यालयात; धुळे मनपा विरोधात मोर्चा

लग्नाचा बस्ता खरेदीसाठी पंढरपुरातील (Pandharpur) एका कापड दुकानात गेलेल्या तरुणीला तहान लागल्यावर चुकून फरशी पुसण्याचे लायझोल टाकलेले केमिकलयुक्त पाणी प्यायला दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यामुळे अस्‍वस्‍थ वाटू लागल्‍याने सदर नववधू तरुणीवर पंढरपूर येथील खासगी रूग्णालयात (Hospital) उपचार सुरू आहेत.

पाणी पिताच तरुणीला घशात जळजळ

पंढरपूर शहरातील आविष्कार या कापड दुकानात गोपाळपूरमधील एक कुटुंब नववधुसह लग्नाचा (Marriage) बस्ता खरेदीसाठी गेले होते. खरेदी सुरू असताना नववधू तरुणीला तहान लागली. त्यावेळी तेथील कामगारांना पाणी मागितले. पण तिथे पाण्याच्या बाटलीत फरशी पुसण्यासाठी लायझोल केमिकल ठेवले होते. तीच बाटली नजरचुकीने तरुणीला पाणी म्हणून दिली. त्या बाटलीतील पाणी पिताच तरुणीला घशात जळजळ होऊ लागली. यांनतर तिला पाणी समजून केमिकल प्यायला दिल्याचे दुकानदाराच्या लक्षात आले. यानंतर तातडीने सदर तरुणीला येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. सदर घटनेबाबत पंढरपूर शहर पोलिस स्टेशनमध्ये नोंद झाली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.