Pandharpur : सभापती, उपसभापतींसह दिग्गजांना धक्का; पंचायत समिती आरक्षण जाहीर

आरक्षण जाहीर झाल्यानंतर चाैका चाैकात राजकीय चर्चा रंगू लागली आहे.
pandharpur , election 2022 , pandharpur panchayat samiti
pandharpur , election 2022 , pandharpur panchayat samitisaam tv

पंढरपूर : पंढरपूर (Pandharpur) पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीमध्ये पंचायत समितीच्या विद्यमान सभापती अर्चना व्हरगर व उपसभापती प्रशांत देशमुख यांच्यासह अनेक सदस्यांचे गण आरक्षीत झाल्याने विद्यमान पदाधिका-यांना मोठा धक्का बसला आहे. येथील पंचायत समितीच्या 20 गणांची आरक्षण सोडत गुरुवारी पंचायत समितीच्या सभागृहात काढण्यात आली. त्यामध्ये विद्यमान सभापती अर्चना व्हरगर यांचा उंबरे पंचायत समिती गण सर्वसाधारण झाला आहे. तर उपसभापती प्रशांत देशमुख यांचा हक्काचा कासेगाव गण ओबीसी महिलेसाठी राखीव झाला आहे. (Pandharpur Panchayat Samiti News)

येथील पंचायत समितीवर मागील अनेक वर्षापासून भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक गटाची सत्ता आहे. यावेळी अनेकांनी पंचायत समितीवर जाण्यासाठी कंबर कसली आहे. तालुक्याच्या राजकारणात महत्वाचा समजला जाणारा कासेगाव गण ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाल्याने पंचायत समितीमध्ये जाण्याची देशमुखांची परंपरा खंडित होणार आहे. जिल्हा परिषदेच्या आरक्षणावर येथील देशमुखांचे राजकारण अवलंबून राहणार आहे.

pandharpur , election 2022 , pandharpur panchayat samiti
Rakhi Sawant : राखी सावंतला मुंबई पोलिसांचा दणका! ट्रॅफिक जाम करणे पडले महागात

राष्टवादी युवक काँग्रेसचे (ncp) जिल्हा अध्यक्ष गणेश पाटील यांचा होमपीच असलेला भोसे पंचायत समिती गण अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे विद्यमान सदस्या प्रफ्फुलता पाटील यांची संधी हुकली आहे. त्यामुळे पाटील यांनाही यावेळी पंचायत समितीच्या राजकारणापासून दूर राहावे लागणार आहे. करकंब गण पुन्हा सर्वसाधारण राहिल्याने विद्यमान सदस्य राहूल पुरवत यांना दिलासा मिळाला आहे.गुरसाळे पंचायत समिती गण ओबीसीसाठी (obc reservation) राखीव झाल्याने माजी सभापती राजेंद्र पाटील यांची ही संधी हुकणार आहे.

pandharpur , election 2022 , pandharpur panchayat samiti
Satara Zilla Parishad : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीसाठीची आरक्षण साेडत जाहीर

पिराची कुरोली पंचायत समिती गण अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे विद्यमान सदस्य व माजी सभापती दिनकर नाईकनवरे यांनाही मोठा फटका बसला आहे. शिवसेनेचे (Shivsena) जिल्हा प्रमुख व विद्यमान पंचायत समितीचे सदस्य संभाजी शिंदे सदस्य यांचा भाळवणी गण सर्वसाधारण आहे. त्यामुळे शिंदे यांना निवडणुक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्यमान सदस्य सत्यवान देवकुळे यांचा पळशी गण ओबीसीसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे त्यांचाही पंचायत समितीत जाण्याचा मार्ग रोखला गेला आहे. खर्डी पंचायत समिती गण सर्वसाधारण झाल्याने खर्डीचे माजी सरपंच प्रणव परिचारकांना येथून निवडणूक लढवण्याची संधी मिळू शकते.

Edited By : Siddharth Latkar

pandharpur , election 2022 , pandharpur panchayat samiti
Commonwealth Games'चे भव्य उद्घाटन, पहिल्याच दिवशी भारत भिडणार या देशांविरुद्ध; वाचा सामन्यांचे वेळापत्रक
pandharpur , election 2022 , pandharpur panchayat samiti
Shravan 2022 : श्रावण महिन्यात मासांहरी पदार्थाबरोबरच या पदार्थांचे सेवन करु नका
pandharpur , election 2022 , pandharpur panchayat samiti
David Warner : टायटॅनिकफेम डेव्हिड वॉर्नर यांचं निधन; कर्करोगाशी झुंज अपयशी

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com