आज वाखरीत दाखल होणार मानाच्या दहा पालख्या...

उद्या आषाढी एकादशी असल्याने सर्वानाच विठुरायांच्या भेटीची आस लागली आहे.
आज वाखरीत दाखल होणार मानाच्या दहा पालख्या...
आज वाखरीत दाखल होणार मानाच्या दहा पालख्या...भारत नागणे

पंढरपूर - आज दुपारी मानाच्या दहा पालख्या वाखरीत दाखल होणार आहे. यानंतर पायी वारी Wari करत संत भार पंढरीत Pandharpur दाखल होईल. उद्या आषाढी एकादशी असल्याने सर्वानाच विठुरायांच्या भेटीची आस लागली आहे.

दरवर्षी वाखरी पालखी तळावर सर्व संतांच्या पालख्यांचे आगमन होत असते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत निळोबाराय, संत चांगावटेश्वर, विठ्ठल रुक्माई संस्थान कौंडिण्यपुर, संत मुक्ताबाई, संत सोपानकाका, संत निवृत्तीनाथ, संत एकनाथ महाराज या पालख्या वाखरी येथे दाखल होणार आहे.

हे देखील पहा -

सोलापूर जिल्हा प्रशासन आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांच्याकडून सर्व पालख्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. आलेल्या सर्व पालख्यांसाठी दहा मंडप तयार केले आहेत. तर पादुका ठेवण्याची आणि वारकरी यांना बसण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

आज वाखरीत दाखल होणार मानाच्या दहा पालख्या...
आज संत भार वाखरी येथील पालखीतळावर दाखल होणार

यानंतर विणेकरी यांचे रिंगण होईल. ते झाल्यावर सगळे संतभार पंढरपूर कडे निघेल. वाखरी पासून १.५ किलोमिटर अंतर प्रत्येक पालखीतील ४० प्रमाणे ४०० वारकरी पायी चालतील. तिथून पंढरपूर मधील मठा पर्यंत प्रत्येक पालखीतील २ प्रमाणे २० वारकरी पायी चालतील. इतर वारकरी एस टी बस मधून त्यांच्या मठात जाणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com