...तर मुख्यमंत्री म्हणून पांडुरंगाची पूजा अजित पवार करतील; राष्ट्रवादीच्या आमदाराचं मोठं वक्तव्य

'एकनाथ शिंदे नावाची व्यक्ती देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमला चालत नाही, ही खदखद चंद्रकांत पाटलांनी बोलून दाखवली.'
Ajit Pawar on obc reservation
Ajit Pawar on obc reservationSaam TV

बारामती : सध्याच सरकार हे घटनाबाह्य सरकार आहे. सर न्यायाधीश रमणा हे घटनेचे अभ्यासक आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यावर हे २ मंत्र्यांचे सरकार लवकरच कोसळेल. शिवाय मध्यावती निवडणूका लागल्या तर राष्ट्रवादीचा (NCP) चांगला परफॉर्मन्स दिसेल, कार्तिकी एकादशीची पूजा ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते असते.

पण मध्यावती निवडणूका जर लागल्या तर मुख्यमंत्री म्हणून पांडुरंगाची पूजा अजित पवार (Ajit Pawar) करतील असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलं ते आज बारामती येथे पत्रकारांशी बोलत होते.

Ajit Pawar on obc reservation
दादा आपण भोळे लोक, शिवसेना, राष्ट्रवादीचं आधीच ठरलं होतं; फडणवीसांचा गंभीर आरोप

यावेळी ते म्हणाले, इतिहासाच्या बाबतीत पवारसाहेबांनी जे मुद्दे मांडले ते मुद्दे अत्यंत मुद्देसुद, अभ्यासू आणि राष्ट्रवादी मुद्दे आहेत. महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण जर कोणी केला असेल तर ते बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांनी केले आहे याबद्दल कोणाच्याही मनात दुमत नाही. शरद पवारांनी (Sharad Pawar) हा मुद्दा आजच नाही तर या अगोदर देखील अनेक वेळा आपल्या भाषणांमध्ये सांगितला असल्याचं ते म्हणाले.

शिवाय यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली, चंद्रकांत पाटलांनी एकनाथ शिंदेबाबत (Eknath Shinde) केलेल्या वक्तव्यावर बोलताना मिटकरी म्हणाले, 'एकनाथ शिंदे नावाची व्यक्ती देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमला चालत नाही, ही खदखद चंद्रकांत पाटलांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नादाला लागून तुमचे थोर पण घालवू नका यांच्या मनात प्रामाणिकपणा नाही, हे त्यांनी आज सिद्ध करून दाखवले असल्याची टीका चंद्रकात पाटलांवर केली.

पाहा व्हिडीओ -

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे राज्य आलं म्हणजे बळीराजाचं राज्य आल्याचा आव फडणवीस साहेबांनी आणू नये, तुमच्या काळात आता एकीकडे महापूर आहे विदर्भ पुराखाली गेला आहे आणि तुम्ही जेवणावळ्या झोडताय महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या शेतकरी हिताच्या निर्णयावर तुम्ही स्थगिती आणला आहे. हे तुमचं असुरी सरकार जास्त टिकणार नाही.

म्हणून मी म्हटलं की, न्यायाधीश रमणा हे घटनेचे जे नव्या खंडपीठाचे सरन्यायाधीश आहेत ते घटनेचे अभ्यासक आहेत. सुप्रीम कोर्ट आम्हाला न्याय देणार, हे सरकार औट घटकेचे ठरेल त्याच्यामुळे देवेंद्रजी तुमचं सरकार आता आलं म्हणजे काही बळीराजाचं सरकार आलं आहे अशा भ्रमात राहू नका, हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही. जनता मात्र तुम्हाला तुमची लायकी लवकरच दाखवून देणार असल्याचंही ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com