विधान परिषदेला पंकजा मुडेंना डावलले ?; प्रितम मुडेंनी दिलं उत्तर

या सरकारच्या अपयशाबद्दल बोलताना खा. मुंडे यांनी टीकास्त्र सोडले.
विधान परिषदेला पंकजा मुडेंना डावलले ?; प्रितम मुडेंनी दिलं उत्तर
विधान परिषदेला पंकजा मुडेंना डावलले ?; प्रितम मुडेंनी दिलं उत्तरSaam TV

बीड : विधानपरिषदेत पंकजा मुंडेंना डावलल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. मात्र विधानपरिषद निवडणुका ज्या भागात आहेत, त्या भागातील लोकांना प्रतिनिधित्व मिळावे ही पक्षाची भूमिका आहे. त्यामुळे यावेळी मुंडेंना डावलले अस म्हणता येणार नाही असं स्पष्ट करत बीडच्या खा. प्रितम मुंडेंनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका केली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या सरकारच्या अपयशाबद्दल बोलताना खा. मुंडे यांनी टीकास्त्र सोडले.

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण नाकारले गेले, या सर्व प्रकरणाला केंद्र सरकार जबाबदार नाही तर राज्य सरकार जबाबदार असल्याची टीका मुंडे यांनी केली आहे.भाजपने पुन्हा एकदा विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना डावलले का? या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या, की ही निवडणूक मराठवाड्यात होत नाहीये,ज्या भागात निवडणूक आहे, त्या भागातील लोकप्रतिनिधी यांना संधी देणं आवश्यक होतं. त्यामुळे डावलले गेले नाही, अस त्यांनी स्पष्ट केलं.

विधान परिषदेला पंकजा मुडेंना डावलले ?; प्रितम मुडेंनी दिलं उत्तर
बल्गेरियात भीषण अपघात, बसला आग; 46 जणांचा मृत्यू

यावेळी त्या पुढे म्हणाल्या, की स्वतःचा दोष झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखविण्याचे काम राज्य सरकार करत आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण घालविण्याचे पाप या सरकारने केले आहे. जर दोष सगळे केंद्राचे असेल तर राज्य चालविण्यासाठी केंद्राकडे द्या. महापुरुषणाचे अवमान करण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. नाचता येईना अंगण वाकडे असं राज्य सरकारचं काम आहे. नवीन गाड्या, बंगल्याची डागडुजी करण्यासाठी पैसे आहेत, मात्र संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी पैसे नाहीत. रोज सकाळी पत्रकारांसमोर विचार मांडायचे. आणि राजकीय टिपण्णी करायची, असं काम या सरकारचं सुरू आहे. समाजातला कुठलाही वर्ग या सरकारच्या कामगिरीवर खुश नाही. सर्व सामान्य नागरिकांनी या सरकारच्या कामगिरीवर डोळा ठेवून त्यांना त्यांची जागा दाखवावी. असं आवाहन देखील यावेळी मुंडेंनी केलं आहे.

बीडच्या रेल्वेला राज्य सारकरकडून मदत नाही, केवळ 19 कोटी राज्याने दिले आहेत. केंद्राने भरपूर मदत केली आहे. राज्य सरकारने वाटा दिला तर 2024 पर्यंत रेल्वे येईल, मी मुख्यमंत्र्यांना मागणी केली आहे, मात्र एकटा लोड केंद्र कसं उचलेल? सरकार सगळी कडेच कमी पडत आहे. कुठल्याही घटकाला न्याय मिळत नाही. लैंगिक अत्याचाराचा मुद्दा गंभीर आहे. बीड जिल्ह्याची मान खाली जात आहे. या सरकारमध्ये दाद कोणाकडे मागायची? हा प्रश्न अनुत्तरित आहे. असंही त्या यावेळी बीड जिल्ह्याच्या कारभरावर बोलतांना म्हणाल्या. दरम्यान विधान परिषदेबाबत बोलतांना त्या म्हणाल्या, की या सर्व पेंड न्यूजच्या गोष्टी आहेत. आधी झालेल्या भाषणाचा नंतर झालेल्या मुलाखतीच्या ही तोडफोड आहे. मुंडेंना डावललं गेलं नाही. असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com