जिल्ह्यात माफिया राज बोकाळल्याचा अजून कोणता पुरावा हवाय; पंकजा मुंडेंचा सवाल

सरकारी अधिकाऱ्यांना जिल्हयात काम करणं सध्या कठीण झालयं, खोट्या बिलावर सह्या करण्यासाठी धमक्या देणाऱ्या गुत्तेदारापासून संरक्षण मिळावं.
जिल्ह्यात माफिया राज बोकाळल्याचा अजून कोणता पुरावा हवाय; पंकजा मुंडेंचा सवाल
जिल्ह्यात माफिया राज बोकाळल्याचा अजून कोणता पुरावा हवाय; पंकजा मुंडेंचा सवालSaam Tv

बीड : "कंत्राटदार धमक्या देऊन , कट्यार दाखवून बिलांवर सह्या घेतात" अशा उद्गाराचे पत्र, अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, संजयकुमार कोकणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना देत, आपल्याला कामकाज करता यावे, यासाठी चक्क रिव्हॉल्व्हर देण्याची मागणी केली आहे. तर यावरून पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) आक्रमक होत खंत व्यक्त करत सवाल केलाय.

सरकारी अधिकाऱ्यांना जिल्हयात काम करणं सध्या कठीण झालयं, खोट्या बिलावर सह्या करण्यासाठी धमक्या देणाऱ्या गुत्तेदारापासून संरक्षण मिळावं. अशी मागणी करण्याची वेळ अधिकाऱ्यांवर येणं हे दुर्दैव असल्याची प्रतिक्रिया, भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विट करून दिली आहे. बीड जिल्हयात (Beed District) माफिया राज बोकाळल्याचा अजून कोणता पुरावा हवाय, याला सत्तेचा पाठिंबा नाही कशावरून? असा सवालही त्यांनी केला आहे.

त्या पुढे म्हणाल्या, की अशा प्रकारे एखाद्या सरकारी अधिकाऱ्यांवर अशी वेळ येणं खरंच दुर्दैव आहे. जिल्हयातील सत्ताधारी नेत्याचे नियंत्रण कसलेही राहिले नाही, त्यामुळेच गेल्या कांही महिन्यांपासून जिल्हयात वाळू माफिया, गुटखा माफिया, चोरांना, गुंडांना अभय, खोट्या केसेस दाखल करणे, गुन्हयात अडकवणे, व्यापाऱ्यांच्या एजन्स्या हडपणे, चांगल्या संस्थेवर दबाव टाकून प्रशासक आणणे. असे प्रकार सत्तेचा गैरवापर करून सर्रास चालू आहेत. गुंडांना पाठिशी घातले जात असून जिल्हयात कायद्याचा कसलाही वचक राहिला नाही. त्यामुळे हे लोक आता मर्जीविरुद्ध जाणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य करत आहेत. सर्वच विभागातले अधिकारी याला वैतागले असून जिल्हयात काम करणे त्यांना कठीण झाले आहे. पण तक्रार करायला कुणी धजावत नाही. जिल्हयातील सत्ताधाऱ्यांना हेच पाहिजे असल्याने अधिकाऱ्यांवर रिव्हॉल्व्हर मागण्याची वेळ आली आहे, माफियाराज बोकाळल्याचा आणखी कोणता पुरावा हवाय? असा सवाल पंकजा मुंडे यांनी ट्विट करत व पत्रक काढत केला आहे.

दरम्यान काही वेळापूर्वीच धनंजय मुंडेंनी याविषयी पत्रक काढून तक्रार देण्याच्या सूचना केल्या आहेत. तर आता पंकजा मुंडे या देखील यावर आक्रमक झाल्या आहेत. तर याविषयी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला असता ते फोनही घेत नाहीत. त्यामुळं पत्र दिल्याने कोकणे यांच्यावर कुणी दबाव टाकलाय का ? असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.