पंकजा मुंडे काढणार नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत

नाराज पदाधिकाऱ्यांशी बोलून पंकजाताई यांच्याकडून समजूत काढली जात आहे. राजीनामासत्रानंतर भाजप बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली माहिती.
पंकजा मुंडे काढणार नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत
पंकजा मुंडे काढणार नाराज पदाधिकाऱ्यांची समजूतSaamTv

विनोद जिरे

बीड - पंकजा मुंडे ( Pankaja Munde) यांच्याकडून स्वतःहा नाराज पदाधिकाऱ्यांशी बोलून समजूत काढली जात आहे. या नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यासाठी, भाजपच्या (BJP) वतीने लवकरच जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये नाराज पदाधिकार्‍यांच्या भावना समजून घेतल्या जाणार आहेत. Pankaja Munde going to take away the displeasure of Supporters

यावेळी पंकजाताई या नाराज पदाधिकाऱ्यांची नक्कीच समजूत काढतील. असा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के (Rajendra Maske) यांनी व्यक्त केला आहे. राजीनामा सत्रानंतर जिल्हाध्यक्ष मस्के यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

हे देखील पहा -

ते म्हणाले, की गेल्या सात तारखेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि या विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांची वर्णी लागेल अशी अपेक्षा बीड जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना होती. मात्र केंद्रीय नेतृत्वाने त्यांना मंत्रिमंडळात घेतले नाही. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संतप्त प्रतिक्रीया आल्या आहेत.

राजीनामा देणारे काही जिल्हा परिषद सदस्य आहेत, काही पदाधिकारी आहेत, तालुका अध्यक्ष आहेत, विविध आघाड्यांचे पदाधिकारी आहेत, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. परंतु त्यांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न झालेला आहे. मात्र त्यांच्या भावना तीव्र आहेत.

पंकजा मुंडे काढणार नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत
भाजपला मोठा धक्का ; बीडमध्ये एकाच दिवशी 11 तालुकाध्यक्षांसह 36 जणांनी दिले राजीनामे !

त्यामुळे त्यांचे राजीनामे जिल्हा कार्यालयाकडे दिले आहेत. परंतु भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या स्वतः कार्यकर्त्यांशी बोलून समजूत काढत आहेत. आतापर्यंत 36 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. अशी माहिती मस्के यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, की त्यांनी हे राजीनामे जिल्हा कार्यालयात दिल्यामुळे, हे राजीनामे घेतले आहेत. आता यावर एक जिल्ह्याची बैठक घेऊन, त्यांची नाराजगी आणि त्यांच्या भावना देखील ऐकून घेतल्या जाणार आहेत आणि यावर पंकजा मुंडे नक्कीच त्यांची समजूत काढतील यात शंका नाही.

दरम्यान या विषयी राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी बोललो आहे. मात्र कार्यकर्त्यांच्या भावना जरी तीव्र असल्या तरी पक्षाचा निर्णय अंतिम असतो. म्हणून पंकजाताई या कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून त्याची नक्कीच समजूत काढतील. असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.