
Pankaja Munde In Shikhar Shingnapur : भाजप नेते (कै.) गाेपीनाथ मुंडे आणि खासदार उदयनराजे भाेसले यांचे गुरुशिष्याचे नाते सर्वश्रुत आहे. (कै.) मुंडे यांची कन्या पंकजा या शिवशक्ती परिक्रमा निमित्त सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूरला येणार म्हटल्यावर उदयनराजेंनी स्वत: त्यांच्या स्वागताची तयारी केली हाेती. सर्वजण पंकजा मुंडेंची वाट पाहत हाेते. (Maharashtra News)
पंकजा मुंडे या शिंगणापूरात दाखल हाेताच त्यांनी खासदार उदयनराजेंची स्वत:चे कान पकडून क्षमा मागितली. त्या म्हणाल्या क्षमा मागते (उशिर झाल्याने), रस्त्यात इतके कार्यकर्ते आणि स्वागत, बापरे... हे सर्व तुमच्या प्रेमामुळेच असे म्हणातच उदयनराजेंनी पंकजा मुंडेंचे पुष्पगुच्छ व सातारी कंदी पेढे देऊन स्वागत केले.
शिखर शिंगणापूर येथे खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांनी मुंडे यांचे स्वागत केल्यानंतर मुंडे यांनी राजेंसमवेत श्री शंभू महादेव मंदिरात जाऊन पूजा अर्चा केली. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मुंडे यांचे केलेल्या स्वागताने त्या भारावून गेल्या.
शिखर शिंगणापूरकडे येण्यापूर्वी फलटण येथे मुख्य चौकात मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी त्यांची स्वागत केले. त्यानंतर खासदार रणजितसिंह निंबाळकर (ranjitsinh naik nimbalkar) यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांतर्फ मुंडेंचे स्वागत करण्यात आले. तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशिल कदम, सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार यांच्यासह मान्यवरांनी मुंडे यांचे स्वागत केले. यावेळी (कै.) गाेपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना कार्यकर्त्यांनी उजाळा दिला.
खंडेरायाचे दर्शन
दरम्यान आज सकाळी पंकजा मुंडे यांनी जेजुरी येथील खंडेरायाचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी कुलधर्म कुलाचार आणि भंडाऱ्याची उधळण केली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना माध्यमांनी देवाला काय प्रार्थना केली असे विचारले असता पंकजा मुंडे म्हणाल्या की,देव सर्वज्ञानी आहे,त्याला काय मागायचं असे नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.