परळीची जनता हुशार; कोणाला किती उडू द्यायचं हे त्यांना कळतं- पंकजा मुंडे

परळीसह बीड जिल्ह्यात घडणाऱ्या घटनेवरून पंकजा मुंडेंनी भाऊ धनंजय मुंडेंवर चांगलाच निशाणा साधलाय.
परळीची जनता हुशार; कोणाला किती उडू द्यायचं हे त्यांना कळतं- पंकजा मुंडे
परळीची जनता हुशार; कोणाला किती उडू द्यायचं हे त्यांना कळतं- पंकजा मुंडेSaamTv

बीड: परळीसह बीड जिल्ह्यात घडणाऱ्या घटनेवरून पंकजा मुंडेंनी भाऊ धनंजय मुंडेंवर चांगलाच निशाणा साधलाय. त्या म्हणाल्या, की परळीची जनता ही फार हुशार आहे, कोणाला किती उडू द्यायचे व कोणाची पतंग कधी काटायची ? हे याना चांगलेच माहीत आहे. मला विरोधकांवर टिका करायची नाही. कारण त्यासाठी मला माझी पातळी खाली करावी लागेलं आणि मी माझी पातळी खाली करनार नाही. असं म्हणत पंकजा मुंडेंनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. त्या परळी येथे आयोजित दीपावली निमित्त स्नेहमिलनाचा कार्यक्रमात बोलत होत्या.

त्या म्हणाल्या परळी नगरीत काँग्रेसचे राजकारण होते, त्यावेळी परळीत देशमुखांचे राजकारण होते. या परळी मतदार संघात अनेक लोकांनी नेतृत्व केलं, अनेकांनी योगदान दिले आहे. या परळीच्या जडणघडणीत खूप लोकांचा वाटा आहे, परळीच्या राजकारणातील ती पिढी कुठे आहे? आणि आत्ता काय राजकारण सुरू आहे ? मला राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंबद्दल टीका करायची नाही, कारण मला त्याच्या एवढं खालच्या पातळीला जाऊन काम करताच येणार नाही, म्हणून मी त्यांच्यावर टीका करणार नाही. मी काम करणारी आहे, मी कामाबद्धल बोलणार आहे, जनतेला सांगायचे आहे, की तुमचा नेता थकला नाही, हुकला नाही, मी तुमच्या सोबत आहे. माझा फाटका कार्यकर्ता देखील प्रामाणिकपने लढणार आहे, ही वानरसेना माझ्या सोबत आहे. असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंच्या टिकेला प्रतिउत्तर दिलंय.

परळीची जनता हुशार; कोणाला किती उडू द्यायचं हे त्यांना कळतं- पंकजा मुंडे
यवतमाळच्या आर्णी नगर परिषदेच्या नगरसेविकेची गळफास घेवून आत्महत्या  

पुढे बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, समुद्र मंथनाच्या वेळी विष पेण्याचे काम या महादेवांनी केले आणि परळी ही महादेवाची नगरी आहे. अनेक लढाया बाकी आहेत, आणि या लढाया मी लढणार आहे. दहा पाच लोक आहेत ज्यांना बील मिळालेत, मात्र शेतकरी, मजूर, सामान्य जनता यांना अद्याप काहीच मिळाले नाही, त्यामुळं ते वेळ आल्यास आपल्या मताची ताकद दाखविणार आहेत.

परळीची जनता ही फार हुशार आहे, कोणाला किती उडू द्यायचे व कोणाची पतंग कधी काटायची? हे यांना चांगलेच माहीत आहे. मी काही मतासाठी काम करत नाही, तर आपल्या लोकांसाठी मी काम करत आहे. माझा नारा स्वच्छ आहे, माझा कार्यकर्ता स्वच्छ आहे आणि माझा फाटकाच कार्यकर्ता नगर पालिकेच्या निवडणुकीत आपल्यासाठी येणार आहे. आपल्याला जे काम करायचं आहे ते सकारात्मक करायचे आहे. असं म्हणत पंकजा मुंडे यांनी परळी नगर पालिका निवडणुकीत आम्ही सज्ज असल्याचा इशारा देखील विरोधकांना दिला आहे..

मुंडे साहेबांनी 40 वर्ष राजकीय जीवनात या परळीसाठी काम केले, मी त्यांचा वारसा घेऊन काम करीत आहे. माणसाचे काम बोलते की आपण कसे आहोत, आज परळीच्या जनतेची मान शरमेने खाली गेलीय. याअगोदर तुम्हाला मी परळीचा आहे असं सांगतांना मान खाली गेली होती का ? असा सवाल करत पंकजा मुंडेंनी परळीत घडणाऱ्या घटनेवरून नाव न घेता धनंजय मुंडेंचा चांगलाच समाचार घेतलाय. त्यामुळं राजाने आधी नियम पाळले पाहिजेत, मगच जनतेला आपण सांगू शकतो, म्हणूनचं मी अगोदर स्वतः नियम पाळत आहे. राजा म्हणजे विलास भोग घेणे नाही, नुसता सत्ता भोगणारा नसतो, तर जनतेची सेवा करण्यासाठी असतो. असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

मला आज राकजिय बोलायचे नाही मात्र कोणी म्हणतय मला उचक्या लागत आहेत. मात्र मी म्हणते मलाच जास्त उचक्या लागत आहेत. मला उमेदवारच मिळणार नाहीत असे मी कुठेतरी ऐकले आहे, जे बोलले ते अगदी बरोबर बोलले कारण माफिया राज, दहशद असलेल्या ठिकाणी कसे लोक येतील ? मात्र मी असे लोक देईल जे लोक हातात परडी धरून येतील आणि जनतेची सेवा करतील. माझे फाटकेंच लोक असतील पण ते प्रामाणिक असतील. माझी वानरसेना माझ्या सोबत आहे, अद्याप आमची ताकद संपलेली नाही. असं म्हणत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर चांगलाच निशाणा साधलाय.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com