Pankaja Munde: 'बाहेरच्या लोकांनी हस्तक्षेप करू नये..' पंकजा मुंडेंचा थेट पक्षाला इशारा, फडणवीसांवर हल्लाबोल

महाभारताच्या युद्धातील अर्जुन आणि कर्ण यांच्या रथाचे उदाहरण देत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकळे यांच्यासमोरचं मुंडेंनी थेट फडणवीसांवर शर संधान साधले आहे.
Pankaja Munde Latest Marathi News
Pankaja Munde Latest Marathi NewsSaam TV

Beed News: गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना त्यांच्याच पक्षातून डावलले जात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बीड दौऱ्याकडेही त्यांनी पाठ फिरवली होती. आता मुंडेंनी थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोरच पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

"बाहेरच्या लोकांनी आता बीड जिल्ह्यात हस्तक्षेप करू नये, आमच्या जिल्ह्यातील सुखाचा संसार आम्हाला सांभाळू द्या," म्हणत भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोरच आपली खदखद व्यक्त केली आहे. महाभारताच्या युद्धातील अर्जुन आणि कर्ण यांच्या रथाचे उदाहरण देत त्यांनी थेट फडणवीसांवर शर संधान डागले आहे.

Pankaja Munde Latest Marathi News
Shivsena Symbol Crisis : शिंदे गट हा राजकीय पक्षच नाही; ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा दावा

याबाबत अधिक माहिती अशी की, मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे भाजपा चे अधिकृत उमेदवार किरण पाटिल यांच्या प्रचारार्थ भाजप कार्यकर्त्यांच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच जिल्ह्यातील भाजपाचे आमदार व सर्व नेते मंडळी उपस्थित होती

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, "राजकारणात काम करत असताना माझी भावना एका मातेची आहे, आईची आहे, माझ्या हाती काही नाही. मात्र धीर देण्याचे व आस देण्याचे माझे काम आहे. बीड जिल्ह्यातील विकासासाठी निधी कधीच थांबला नाही"

Pankaja Munde Latest Marathi News
Mumbai News: रेल्वे प्रवाशांचे लॅपटॉप, मोबाईल करायचा लंपास; ४ लॅपटॉप, ३ मोबाईलसह आरोपी ताब्‍यात

त्याचबरोबर, "आपल्या जिल्ह्यातील शिस्त आता बिघडवू द्यायची नसेल तर जिल्हयाच्या मातीतील माणूस जिल्ह्याची घडी बसवण्यासाठी लागतो, बाहेरच्या लोकांनी आता जिल्ह्यात हस्तक्षेप करू नये,"असे म्हणत थेट पक्षाध्यक्षांना इशारा दिला आहे..

दरम्यान, बीड जिल्ह्याच्या मतांमुळे महाराष्ट्राच्या विकासात फार मोठा फरक पडतो. तर सत्तेतील मंत्र्यांनी या जिल्ह्याला भरभरून द्यावे, अशी अपेक्षा ही मुंडेंनी यावेळी व्यक्त केली. आज माझ्याकडे कोणते पद नाही, आमचा सुखाचा संसार चालू द्या, आम्ही काही लोकं मिळून आमचा जिल्हा चांगला सांभाळतो, असे ही बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या. (Beed News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com