Pankaja Munde In Kolhapur : देवी आई..., दुसऱ्याच्या दारात जायची वेळ येऊ नये : पंकजा मुंडे (पाहा व्हिडिओ)

shiv shakti parikrama : श्री करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
pankaja munde, kolhapur, shiv shakti parikrama
pankaja munde, kolhapur, shiv shakti parikramasaam tv

Kolhapur News : कार्यकर्ते सन 2014 पासून मी मुख्यमंत्री व्हावं असे म्हणत आहेत. या गोष्टी काही नवीन नाहीत असे भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे (pankaja munde in kolhapur) यांनी काेल्हापूरात नमूद केले. शिवशक्ती परिक्रमा यात्रेनिमित्त दौऱ्यावर असलेल्या पंकजा मुंडे या आज (गुरुवार) कोल्हापुरात आल्या हाेत्या. श्री करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Maharashtra News)

pankaja munde, kolhapur, shiv shakti parikrama
Maratha Andolan In Kopardi : आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसू नये : राेहित पवार

अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर देवीला काही मागितले नाही असे मुंडे यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या आपण देवी चरणी सर्वांना काही ही कमी पडू देऊ नको तसेच कोणाला उपाशी झोपू देऊ नको आणि कोणाला दुसऱ्याच्या दारात जायची वेळ येऊ देऊ नको. आपल्या दारात आलेल्या माणसाला रिकाम्या हाती जाऊ देऊ नको अशी प्रार्थना केल्याचे मुंडेंनी नमूद केले.

pankaja munde, kolhapur, shiv shakti parikrama
Rajaram Sahakari Sakhar Karkhana : महादेवराव महाडिक गटास माेठा धक्का, 'राजाराम' चे 1272 सभासद अपात्र; सतेज पाटील कारखाना ताब्यात घेणार?

मुंडे म्हणाल्या गेल्या अनेक वर्षांपासून मी मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा कार्यकर्ते व्यक्त करत आहेत, मात्र हे काही नवीन नाही. मी सध्या शिव शक्ती परिक्रमा यात्रा करत असून ज्योतिर्लिंग आणि साडेतीन शक्तीपीठे यांसह पंढरपूर अक्कलकोट या सर्व ठिकाणी जाऊन दर्शन घेत आहे.

या यात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून ठिकठिकाणी जंगी स्वागत होत आहे. दरम्यान काँग्रेस कडून देखील सध्या जनसंवाद यात्रा सुरू असून त्यांची जनसंवाद यात्रा आणि माझी यात्रा ही पूर्णपणे वेगळी आहे असे एका प्रश्नावर उत्तर देताना मुंडे यांनी स्पष्ट केले. त्यांच्या यात्रेत उपस्थित केलेले प्रश्न हे त्यांचे आहेत असेही त्यांनी नमूद केले.

मी माझ्या स्थानी योग्य आहे आणि याचं मला काहीही वाटत नाही असे मुंडेंनी तुम्हांला मागच्या रांगेत ठेवण्यात आले आहे का या प्रश्नावर उत्तर देताना स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com