Mumbai | मुंबईत लोकलच्या डब्यात आढळला तरुणाचा मृतदेह; पनवेल स्थानकात खळबळ

पनवेल रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या पनवेल-सीएसएमटी लोकलमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे.
file photo
file photo saam tv

सिद्धेश म्हात्रे

Panvel Railway Station News : पनवेल रेल्वे स्थानकातून धक्कादायक वृत्त समोर आले आहे. पनवेल रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या पनवेल-सीएसएमटी लोकलमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. सदर घटनेनंतर पनवेल रेल्वे स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पनवेल (Panvel) रेल्वे स्थानकावर उभ्या लोकलमध्ये प्रवासी चढले, त्यावेळी मृतदेह प्रवाशांच्या नजरेस पडला. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

file photo
Malegoan Crime News : सटाणा नाका भागात बंदूकीचा धाक दाखवत युवकांनी लुटले लाख रुपये

मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल रेल्वे स्थानकात पनवेल सीएसएमटी लोकलमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. लोकल डब्ब्यात मृतदेह हा प्रवाशांच्या नजरेस पडला. उपस्थित प्रवाशांनी पोलिसांना सदर घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी येत तपासाला सुरुवात केली. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. सदर व्यक्तीचा मृत्यू कसा झाला याचा तपास सुरू आहे. मृत व्यक्तीचे वय ३० ते ३५ वर्ष आहे. तसेच मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

file photo
पालकांनो सावधान! ८ महिन्यांच्या बाळाने गिळलं नेलकटर; नाशकातील धक्कादायक घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल रेल्वे स्थानकात मंगळवारी सकाळी रेल्वे डब्ब्यात मृतदेह आढळला आहे. सदर मृत व्यक्तीचे अंदाजे वय ३५ ते ४० वर्षाच्या दरम्यान आहे. या घटनेनंतर पनवेल रेल्वे पोलिसांची मृत व्यक्तीच्या मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही लोकल कुर्ला स्थानकावरून पनवेल स्थानकात आली. पनवेल स्थानकावरून ही लोकल सकाळी ९.५३ वाजता सीएसएमटी स्थानकात जाणार होती. याच लोकल ट्रेनच्या माल डब्ब्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com