
सिद्धेश म्हात्रे
पनवेल : मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर(Mumbai pune express highway) गाड्या आणि टँकर अडवून लुटणारी टोळी सक्रीय झाली.या टोळीची दहशत अनेक वाहन चालकांच्या मनात बसली आहे. या टोळीने पनवेल तालुक्यातील अरीवली येथे वाहन चालकाची गाडी अडवून लूट केली होती. यामुळे पनवेल (Panvel) तालुका पोलिसात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. त्यानंतर तांत्रिक तपास करत पोलिसांनी गाड्या अडवून लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी खालापूरमधील आदिवासी पाड्यावरून सदर टोळीला अटक केली आहे. (Panvel Latest Crime News in Marathi)
हे देखील पाहा -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर गाड्या आणि टँकर अडवून ही टोळी लुटमार करत होती. टोळीच्या सततच्या लुटमारीने पुणे-एक्सप्रेस मार्गावर उशिराने गाड्या चालवणाऱ्यांच्या मनात टोळीची दहशत निर्माण झाली होती. या टोळीने पनवेल तालुक्यातील अरीवली येथे लुटमारीचा गुन्हा केला होता. या प्रकरणाचा गुन्हा पनवेल तालुका पोलीस ठाण्यात नोंद होताच पोलिसांनी सुत्रे हलवली. त्यानंतर पनवेल तालुका पोलिसांनी तांत्रिक तपास करत आरोपी टोळीला खालापूरमधील आदिवासी पाड्यावरून अटक केली. यावेळी पोलिसांनी १ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे.
दरम्यान, पनवेल तालुका पोलिसांनी या जेरबंद करत टोळीच्या म्होरक्याकडून अधिक चौकशी केली. या चौकशी अनेक जुन्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. सदर टोळीने मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्ग आणि जुना मुंबई-पुणे महामार्गावरील तळेगाव, कामशेत व पुणे परिसरातही गंभीर गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. या टोळीकडून पोलिसांनी विविध गुन्ह्यात चोरलेले २७ हजार रोख आणि १ लाख २३ हजार किंमतीचे २९ मोबाइल हस्तगत केले आहेत. पोलिसांनी टोळीकडून एकूण १ लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
Edited By - Vishal Gangurde
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.