
अमर घटारे, अमरावती
LLB Paper Leak: अमरावतीमधून पेपर फुटीची मोठी बातमी समोर आली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात विधी (LLB) विषयाचा पेपर परिक्षेआधीच फोडण्यात आला आहे. या घटनेत भाजपच्या माजी नगरसेवकाचा हात असल्याचे समजले आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. (Latest Paper Leak News)
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, 'शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था' अमरावतीमध्ये लॉ ऑफ स्ट्रट विषयाची फस्ट सेम बॅकलॉकची परीक्षा सुरू होती. यावेळी भाजपचे माजी नगरसेवक प्रणित सोनी यांनी मोबाईलमध्ये प्रश्नपत्रीकेचे फोटो काढून घेतले. त्यानंतर व्हाट्सअॅपवरून परीक्षा सुरू होताच बाहेरच्या एका व्यक्तीला पेपर शेअर केला.
परीक्षा केंद्रावर शिक्षकांना मोबाईल कसा दिला गेला हा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालाय. तसेच परीक्षा केंद्रावर दोन वेगवेगळ्या रूममधील विद्यार्थी एकाच रूममधे आढळले आहेत. तर दुसऱ्या रूममध्ये त्या विद्यार्थ्याला गैरहजर दाखविण्यात आलं आहे. या प्रकरणामुळे अमरावती शासकीय ज्ञान विज्ञान संस्थेचा भोंगळ करभार चव्हाट्यावर आलाय.
दरम्यान या संपूर्ण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेवकाचे नाव समोर येत आहे. त्यांनीच हा पेपर फोडल्याचं म्हटलं जात आहे. सदर घटनेमुळे परीक्षा केंद्राबाहेर एकच खळबळ उडाली.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.