परभणीत लसीकरणाला गती; प्रत्येक वाॅर्डात जाऊन होणार लसीकरण

तर अद्यापही 65 टक्के नागरिकांनी पहिलाच डोस घेतला नाही , शिवाय लसीकरणात परभणीचा राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 28 वा नंबर आहे.
परभणीत लसीकरणाला गती; प्रत्येक वाॅर्डात जाऊन होणार लसीकरण
परभणीत लसीकरणाला गती; प्रत्येक वाॅर्डात जाऊन होणार लसीकरणSaam Tv

परभणी: जिल्ह्यात (Parbhani District) मंदावलेल्या लसीकरणाला (Corona Vaccination) गती देण्यासाठी जिल्हा प्रशासन आता अॅक्टिव्ह मोड मध्ये आला असून , पुढच्या दोन आठवड्यात शहरात लसीकरणाची गती वाढविण्यासाठी विविध उपाययोजना राबविणार असल्याची माहिती आज जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी माध्यमांना दिली. परभणी जिल्ह्यात आतापर्यंत फक्त 45 टक्के नागरिकांनी पहिला आणि दुसरा डोस घेतला आहे.

तर अद्यापही 65 टक्के नागरिकांनी पहिलाच डोस घेतला नाही , शिवाय लसीकरणात परभणीचा राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 28 वा नंबर आहे. त्यात शहरी भागात तर लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे.

परभणीत लसीकरणाला गती; प्रत्येक वाॅर्डात जाऊन होणार लसीकरण
गेम खेळायला दिली नाही म्हणून पोटच्या मुलाने केला वडिलांचा खून!

चार लाख लोकसंख्या असलेल्या परभणी महानगरपालिका क्षेत्रात केवळ 80 हजार नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे , त्यामुळेच जिल्हा प्रशासन आता हरकतीत आला असून येणाऱ्या दोन आठवड्यात परभणी महापालिका क्षेत्रात असलेल्या प्रत्येक वॉर्डात लसीकरण सेंटर उभारण्यात येणार आहे . ज्या ठिकांनी पहिल्या पासून लस देने सुरू आहे , तेथे ही केंद्र सुरूच राहणार , जिल्हा प्रशासनाने दोनशे कर्मचाऱ्यांचे 23 पथक बनवले असून, यात महानगरपालिकेत असलेले बी.एल.ओ आणि आशा वर्कर यांची टीम तयार करण्यात आली आहे .

8 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या काळात हा उपक्रम राबवला जाणार आहे. शिवाय येणाऱ्या दिवसात गणेशोत्सव निमित्ताने ही प्रशासनाने सामाजिक अंतर आणि मास्क वापरण्याचे आवाहन जनतेला केले आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोविशील्ड आणि कोवॅक्सिनचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचेही श्रीमती गोयल यांनी सांगितले. परभणी सारख्या शहरी भागात 10 लाख नागरिकांनी लस घेतली नाही, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळेच लसीकरणासाठी जिल्हा प्रशासन आता जोरदार प्रयत्न करणार आहे. आता परभणीकर जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारास कसा प्रतिसाद देते हे येणाऱ्या दिवसात कळेल.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com