Raj Thackeray News : राज ठाकरे यांचे अटक वॉरंट ५०० रुपयांत रद्द; परळी कोर्टाने दिला निर्णय

परळी कोर्टाने राज ठाकरे यांचे ५०० रुपयांत अटक वॉरंट रद्द केला आहे.
raj thackeray
raj thackeraySAAM TV

Raj Thackeray News : चिथावणीखोर वक्तव्याबद्दल परळी (बीड) कोर्टाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना अजामीनपात्र वॉरंट बजावले हाेते. हे वॉरंट रद्द करून जामीन मिळावा यासाठी राज ठाकरे हे आज परळी कोर्टात हजर झाले. परळी कोर्टाने राज ठाकरे यांचे ५०० रुपयांत अटक वॉरंट रद्द केला आहे. (Latest Marathi News )

raj thackeray
Cm Eknath Shinde | महाराष्ट्रात 45 हजार कोटींची गुंतवणूक #cmshinde #daoos #udaysamant

परळी कोर्टात नेमकं काय घडलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दुपारी ११ : 38 वाजण्याच्या सुमारास परळी कोर्टामध्ये दाखल झाले. राज ठाकरे बारा मिनिटे कोर्टामध्ये होते. कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर कोर्टाने बाहेर सुरू असलेल्या कार्यकर्त्यांच्या घोषणामुळे संतापले.

कामकाज सुरू झाल्यानंतर राज ठाकरे यांचे वकील राजन शिरोडकर यांनी बाजू मांडली. आजारी असल्यामुळे आणि घशावरील शस्त्रक्रियेमुळे कोर्टात येणे शक्य झाले नाही. त्यानंतर आज स्वतःहून हजर राहिल्याचे सांगितले. त्यानंतर कोर्टाने त्यांच्या मेडिकलची फाईल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर याबाबतची फाईल सादर करण्यात येईल असे राज ठाकरे यांच्या वकिलानी सांगितले.

राज ठाकरे यांच्या वकिलाचे म्हणणे ऐकल्यानंतर परळी कोर्टाने पाचशे रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर वॉरंट रद्द करून जामीन मंजूर केला. कोर्टामध्ये बारा मिनिटे राज ठाकरे हे शांतपणे उभे होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com