परमबीर सिंगांची बेनामी मालमत्ता? बनावट शेतकरी दाखल्याचा वापर; पाहा Video

सध्या फरार असलेले मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
परमबीर सिंगांची बेनामी मालमत्ता? बनावट शेतकरी दाखल्याचा वापर; पाहा Video
परमबीर सिंगांची बेनामी मालमत्ता? बनावट शेतकरी दाखल्याचा वापर; पाहा VideoSaam TV

नाशिक: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या नाशिक जिल्ह्यात (Nashik District) बेनामी मालमत्ता असल्याची जोरदार चर्चा असून सिंग त्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे संजय पुनुमिया (Sanjay Punumiya) यांच्या माध्यमातून हे व्यवहार झाल्याचं बोललं जातंय. धक्कादायक बाब म्हणजे सिन्नरमध्ये जमीन घेण्यासाठी पुनुमियानं चक्क शेतकरी असल्याचा बनावट दाखल्याचा वापर केल्यानं त्याच्याविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

सध्या फरार असलेले मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण सिंग यांचे निकटवर्तीय समजले जाणारे आणि सिंग यांच्याशी संबंधित एका खंडणीच्या गुन्ह्यात सहआरोपी असलेले संजय पुनुमिया यांनी नाशिक जिल्ह्यात ईगतपुरी आणि सिन्नर तालुक्यात महामार्गालगत कोट्यवधींच्या जमिनींची खरेदी केल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे सिन्नर तालुक्यातील धारणगावमध्ये शेतजमीन खरेदी करतांना पुनुमियानं चक्क बनावट शेतकरी दाखल्याचा वापर केल्यानं त्याच्यावर सिन्नरच्या दुय्यम निबंधक कार्यालयाकडून पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परमबीर सिंगांची बेनामी मालमत्ता? बनावट शेतकरी दाखल्याचा वापर; पाहा Video
Video: वानखेडेंवर पोलिसांची पाळत? NCB कारवाईवरुन राजकीय नेत्यांत जुंपली

संजय पुनुमिया आणि सनी पुनुमिया यांच्या नावे असलेली शेतजमीन

- सिंन्नर तालुक्यातील धारणगावमध्ये पावणे दोन हेक्टर तर मिरगावमध्ये साडे सहा हेक्टर शेतजमीन.

- या व्यतिरिक्त ईगतपुरीच्या धामणगाव आणि अन्य काही ठिकाणीही जमीन असल्याचा संशय.

- खरेदी करण्यात आलेल्या जमिनी समृद्धी महामार्ग आणि सिन्नर-शिर्डी महामार्गालगत

- या शेतजमिनींची किंमत कोट्यावधींच्या घरात आहे

संजय पुनुमियानं बनावट शेतकरी दाखल्याच्या आधारे शेतजमीन खरेदी केल्याचं समोर आल्यानंतर या प्रकरणाचं गांभीर्य वाढलंय. संजय पुनुमिया आणि सिंग यांची व्यावसायिक भागीदारी असल्याचा संशय असल्यानं पोलीस आणि राज्य गुप्तचर यंत्रणेकडून पुनुमियाच्या नावावर असलेल्या जिल्ह्यातील जमिनींचा शोध घेऊन त्याची माहिती गोळा केली जातेय. तर सध्या खंडणीच्या गुन्ह्यात ठाणे पोलिसांच्या कस्टडीत असलेल्या पुनुमियाची कस्टडी नाशिक ग्रामीण पोलिसांनी मागितली असून न्यायालयानंही त्याला परवानगी दिलीय. त्यामुळे लवकरच नाशिक ग्रामीण पोलीस पुनुमियाला ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि ईगतपुरी तालुक्यात खरेदी करण्यात आलेल्या जमिनींच्या कागदपत्रं आणि व्यवहारात थेट परमबीर सिंग यांचं नाव आलेलं नसलं, तरी संजय पुनुमियाच्या माध्यमातून परमबीर सिंग यांनी हे पैसे गुंतवल्याची चर्चा आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांनी संजय पुनुमियाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर परमबीर सिंग यांचा या जमीन व्यवहारात थेट संबंध आहे का? सिंग आणि पुनुमिया यांची व्यावसायिक भागीदारी आहे का? अशा अनेक बाबी समोर येणार असून अनेक धक्कादायक खुलासे उघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या प्रकरणी तपासानंतर काय सत्य समोर येतं? हे पाहणं महत्वाचं असेल.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.