इंधनावरील व्हॅट कमी करा; भाजपचं परभणीत आंदोलन

या आंदोलनानंतर भाजपच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना दिले.
इंधनावरील व्हॅट कमी करा; भाजपचं परभणीत आंदोलन
parbhani bjp karyakarta

परभणी : केंद्र सरकारने ज्या प्रकारे पेट्रोल,डिझेलवरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला आहे. त्याच प्रकारे राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही करात कपात करून जनतेला दिलासा द्यावा या मागणीसाठी आज (शुक्रवार) परभणीत भाजपाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. parbhani bjp demands to reduce petrol diesel price in maharashtra

parbhani bjp karyakarta
महंमद पैगंबरांविषयी बेताल वक्तव्य; बुलढाणा बंदला प्रतिसाद

या आंदोलनानंतर भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना निवेदन दिले. या निवेदनात राज्य सरकारने व्हॅट कमी केल्यास इंधनाच्या दराचा भार जनतेवर कमी पडेल असे नमूद करीत सरकारने तातडीने यावर विचार करावा अशी मागणी केली आहे.

यावेळी आनंद भरोसे (भाजप महानगरअध्यक्ष, परभणी) म्हणाले मोदी सरकारने ज्या प्रकारे पेट्रोल-डिझेलवरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला. त्याच प्रकारे राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही करात कपात करून जनतेला दिलासा द्यावा अशी आमची प्रमुख मागणी आहे असे सांगितले. या आंदाेलनात भाजपचे विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले हाेते.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com