
परभणी येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. सोनपेठ नगर परिषदेचे लेखापाल अधिकारी किशोर भिसे यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. (Latest Marathi News)
मयत भिसे हे नुकतेस पाथरी नगर परिषद येथून बदली होऊन सोनपेठला रुजू झाले होते. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंधारे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
किशोर भिसे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय सोनपेठ येथे हलवला आहे. सरकारी अधिकाऱ्याने आत्महत्या केल्यानंतर शहरात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
अल्पवयीन मुलीची मानसिक तणावातून आत्महत्या
कल्याणमध्येही आत्महत्येची अशीच एक घटना समोर आली आहे. कल्याण पश्चिमेतील एका परिसरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबासोबत राहत होती. शुक्रवारी ती मानसिक तणावात असल्याचं घराच्यांना निदर्शनात आलं. तेव्हा तिच्या भावाने तिच्याकडे याबाबत चौकशीही केली.
भावाला सांगितले की, माझ्यासोबत काहीतरी वेगळेच घडले आहे. माझ्यासोबत माझ्या मित्रांनी गैरकृत्य करत छेडछाड केली आहे. हे ऐकताच भावाला काही सुचेनासे झाले तो घराबाहेर गेला आणि काही वेळाने घरात आता त्यावेळी बहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सदर घटनेमुळे कल्याण शहरात हळहळ व्यक्त केली जातेय.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.