Parbhani Crime News: पोलीस हवालदाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण; परभणीतील धक्कादायक घटना

परभणीत पोलीस हवालदाराला लाथामुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.
parbhani crime news
parbhani crime newssaam tv

Parbhani News: परभणीतून धक्कादायक घटना घडली आहे. परभणीत पोलीस हवालदाराला लाथामुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. गंगाखेड तालुक्यातील शेंडगा येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांत सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक संपल्यानंतर स्पिकरकडे जात असलेल्या पोलीस हवालदाराला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास घडली.

परभणीतील गंगाखेड तालुक्यातील शेंडगा येथे ही घटना घडली. सदर प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार नारायण एकनाथ लटपटे यांनी तक्रार दिली आहे.

parbhani crime news
Madhya Pradesh Crime News: जन्मदात्या आईचे क्रूर कृत्य! पोटच्या तीन लेकींची केली निर्घृण हत्या; धक्कादायक कारण समोर

नेमकं काय घडलं?

गंगाखेड तालुक्यातील शेंडगा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक होती. मिरवणूक संपल्यानंतर नारायण लटपटे हे स्पिकरकडे जात होते. त्यावेळी गाणे वाजविण्याच्या कारणावरून आरोपींनी संगनमत करत पोलिसाला थापडबुक्क्यांनी मारहाण केली.

या आरोपींनी पोलीस हवालदाराचे शर्ट फाडलं. काठीने डोक्यात मारून दुखापत केली. शासकीय कामात अडथळा केल्याने अंतराम तिडके, बंटी तिडके, हरीभाऊ तिडके, सुरेश तिडके, आबा वाव्हळे व इतर एकावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे करत आहेत.

parbhani crime news
Pune Crime News: आम्ही आमदार आहोत सांगायचे, अन्... पुण्यात फसवणुकीचा भलताच प्रकार आला समोर

नांदेड-पुणे एक्सप्रेसमध्ये दोन विद्यार्थ्यांना बेदम मारहाण

वातानुकूलित रेल्वे डब्यात बसलेल्या दोन विद्यार्थ्यांना एका माजी नगरसेवकाने जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांवपूर्वी घडली होती. परभणीतून ही घटना समोर आली. 9 एप्रिल रोजी नांदेड-पुणे एक्सप्रेस रेल्वेमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी 18 एप्रिल रोजी नांदेड रेल्वे पोलिसात नगरसेवकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

parbhani crime news
Kalyan Crime News: अल्पवयीन मैत्रिणीला भेटण्याच्या बहाण्याने घरी बोलावून सामूहिक अत्याचार; घटनेनं कल्याण हादरलं

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नांदेड येथील 22 वर्षीय दोन विद्यार्थी पुणे येथे जाण्यासाठी पुणे एक्सप्रेस रेल्वेत बसले होते. यातील एक जण बी1 आणि दुसरा बी३ डब्यात होता. नांदेड ते पूर्णा दरम्यान रेल्वेत असताना परभणीचा माजी नगरसेवक प्रशांत उर्फ बबलू केशवराव नागरे हा बी3 डब्ब्यात आला.यावेळी त्याची व विद्यार्थ्यांची जागेवरून कुरबुर झाली. त्यानंतर एका माजी नगरसेवकाने रेल्वेतील २ विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com