डिग्रस बंधाऱ्यातून १० दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग
डिग्रस बंधाऱ्यातून १० दरवाजे उघडून पाण्याचा विसर्गराजेश काटकर

डिग्रस बंधाऱ्यातून १० दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग

अतिवृष्टी झाल्याने गोदावरी नदीच्या पात्रात येणारा पाण्याचा साठा वाढला

परभणी - पालम तालुक्यातील गोदावरी नदीच्या Godavari River पात्रात असलेल्या डिग्रस बंधाऱ्यातून ६ सप्टेंबर रोजी सकाळपासून १४ पैकी १० दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पात्रात पाणी वेगाने वाहत आहे. पालम Palam तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्यातून वेळोवेळी पाणी पातळी नियंत्रित करून अतिरिक्त पाणी साठा सोडून दिला जात आहे. पण मागील चार दिवसांत अतिवृष्टी झाल्याने गोदावरी नदीच्या पात्रात येणारा पाण्याचा साठा वाढला आहे.

हे देखील पहा -

यातच डिग्रस बंधाऱ्यावरील साखळी बंधारे पुर्ण क्षमतेने भरले असल्याने पाणी पात्रात मोठ्या प्रमाणात येत आहे त्यामुळे खबरदारी म्हणून डिग्रस बंधाऱ्यातून पाणी सोडण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. गोदावरी नदी काठच्या शेत जमीनीतील पिकात पाणी घुसून पिकाची नासाडी होऊ नये याची ही दक्षता घेतली जात आहे.

डिग्रस बंधाऱ्यातून १० दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग
समितीला आढळले मुदत संपलेले ओआरएस व औषधी; नंदुरबार जिल्‍ह्यातील धक्‍कादायक प्रकार

पाणी पातळीत प्रचंड वाढ होत असल्याने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यासाठी १४ पैकी १० दरवाजे उघडले गेले आहेत. ६ सप्टेंबर रोजी रात्रभर हे दरवाजे कायम उघडे ठेवले जाणार आहेत. पात्रात येणारे पाणी पातळी पाहून नंतर दरवाजे बंद जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या तरी वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com