परभणी जिल्हात पावसाचा हाहा:कार, शेती झाली स्विमिंग पूल!

दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसाने जिल्हातील सर्व तालुक्यात हाहा:कार माजवला आहे. जिल्ह्यातील अनेक महामार्ग या पावसामुळे बंद झाले आहेत. अनेक गावात नागरिकांच्या घरात पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
परभणी जिल्हात पावसाचा हाहा:कार, शेती झाली स्विमिंग पूल!
परभणी जिल्हात पावसाचा हाहा:कार, शेती झाली स्विमिंग पूल! राजेश काटकर

परभणी : दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसाने जिल्हातील सर्व तालुक्यात हाहा:कार माजवला आहे. जिल्ह्यातील अनेक महामार्ग या पावसामुळे बंद झाले आहेत. अनेक गावात नागरिकांच्या घरात पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रामुख्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरिपातील हजारो हेक्टर पिके पाण्यात गेली आहेत. फळबागा व भाजीपाला आदी पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

हे देखील पहा :

एकीकडे नुकसान झाले आहे तर दुसरीकडे पावसामुळे जिल्ह्यातील येलदरी व दूधना धरणे भारत आली आहेत. जिल्ह्यातील लहान-मोठी धरणे शंभर टक्के भरली आहेत. जिल्ह्यात पाऊस इतक्या मोठ्या प्रमाणात होता की जिल्हातील शेतीत पाच ते दहा फूट पाणी साचल्याने शेतकरी आता कापूस सोयाबीन च्या शेतात अक्षरशः पोहत आहेत.

परभणी जिल्हात पावसाचा हाहा:कार, शेती झाली स्विमिंग पूल!
Breaking Latur : लातुरात पावसाचा हाहा:कार!

परभणी जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस मंगळवारच्या रात्री पर्यंत सर्वदूर पडत होता. या पावसाने अनेक पूल पाण्याखाली गेले असून अनेक मार्गावर वाहतूक बंद करावी लागली आहे. या पावसाचा फटका प्रामुख्याने शेतीला बसला असून खरिपातील हाता तोंडाशी आलेली पिके पार पाण्यात बुडाली आहेत. अश्या भीषण परिस्थितीचा सामना शेतकरी करत असून सरकार कडे मदतीची मागणी करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com