परभणी : लोअर दूधना प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ

मंगळवारपासून लोअर दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्यामुळे तसेच सद्य:स्थितीत देखील जोरदार पाऊस होत असल्यामुळे बुधवारी सकाळी दहा वाजेपर्यंत जलाशयात एकूण ८३ टक्के जलसाठा झाला उपलब्ध झाला आहे.
परभणी : लोअर दूधना प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ
परभणीच्या लोअर दूधनात पाण्याची वाढ

विलास शिंदे

सेलू (जिल्हा परभणी ) : लोअर दुधना प्रकल्प धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी रात्री व बुधवारी (ता. १४) रोजी सकाळपासून लोअर दुधना प्रकल्पात पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरु असल्याने या प्रकल्पातून कोणत्याहीक्षणी दुधना नदीच्या पात्रात पाणी सोडले जाईल असा इशारा पुर नियंत्रण कक्षाने दिला आहे.

मंगळवारपासून लोअर दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्यामुळे तसेच सद्य:स्थितीत देखील जोरदार पाऊस होत असल्यामुळे बुधवारी सकाळी दहा वाजेपर्यंत जलाशयात एकूण ८३ टक्के जलसाठा झाला उपलब्ध झाला आहे. आणि अजून त्यामध्ये भर पडत आहे.त्यामुळे प्रकल्पात शंभर टक्के जलसाठा लवकरच होऊ शकतो.त्यामुळे द्वार परिचालन आराखड्यानुसार प्रकल्पाचे दरवाजे लवकरच उघडावे लागतील अशी शक्यता आहे.

हेही वाचा - जिल्ह्यात दीर्घ उघडीपीनंतर मागील चार दिवसापासून पावसाने सुरवात केली. हा पाऊस जिल्ह्याच्या सर्वच भागात होत आहेत.

लोअर दुधना प्रकल्पाच्या खालील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे. नदीपात्रात उतरु नये, गुरेढोरे, विद्युत साहित्य, वैगरे असल्यास लागलीच काढून घ्यावे असे आवाहन पूर नियंत्रण कक्षाने केले आहे. लोअर दुधना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरणात पाण्याची मोठी आवक सुरु झाली आहे. धरणात बुधवारी सकाळी ९, ५०० क्यूसेसने पाण्याची आवक सुरु असल्याची माहिती धरणाचे शाखा अभियंता सतिश बागले यांनी दिली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com