Bus Accident: दुचाकीस्वाराला वाचविताना बसचा अपघात; सहा जण जखमी

दुचाकीस्वाराला वाचविताना बसचा अपघात; सहा जण जखमी
Bus Accident
Bus AccidentSaam tv

जिंतूर : परभणी महामार्गावरील कोक गावाजवळ असलेल्या सुहास धाब्याजवळ दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी महामंडळाच्‍या बसला अपघात (Bus Accident) झाला. रस्ता सोडून खड्ड्यात जाऊन बस आदळल्याने सहा जण जखमी झाले आहेत. ही घटना दुपारच्या सुमारास घडली. अपघातात (Accident) जखमी झालेल्या चालक, वाहकासह अन्य चार प्रवाशांना बोरी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. (Maharashtra News)

Bus Accident
Nandurbar News: धावत्या बसचा ब्रेक फेल; चालकाने प्रसंगावधान राखत १२ किमीपर्यंत चालवली विना ब्रेक गाडी

नांदेड (Nanded) आगाराची बस जिंतूर येथून नांदेडकडे जात होती. कोकजवळील सुहास धाब्याच्या परीसरात आज दुपारी एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बस रस्त्या शेजारील एका खड्डयात जावून आदळली. यामध्ये (St Bus) बसच्या समोरील भाग पुर्णत: चेंदामेंदा झाला आहे. या अपघातात बसचे चालक मोहमंद मुस्तफा मोहमंद अकलम (नांदेड), वाहक गजानन बापुराव हिवरे (नांदेड) यांच्यासह नेहरूबी शेख हुसेन (रा.देवसडी), शेख हुसेन शेख अकबर (रा.देवसडी), नामदेव यादवराव भरकड (परभणी), राजु लक्ष्मण पवार (रा.बोरी) असे एकुण सहा जण जखमी झाले आहेत.

दोघांची प्रकृती गंभीर

घटनेची माहिती समजताच नागरीकांनी अपघातस्थळी मोठी गर्दी केली. नागरीकांनीच जखमींना बोरी रुग्णालयात हलवण्यासाठी मदत केली. या जखमींवर बोरी येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. या जखमीतील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com