तिसऱ्या लाटेचा धोका..जिल्हा रुग्णालयात कोरोना नियमाकडे पाठ
Parbhani civil hospital

तिसऱ्या लाटेचा धोका..जिल्हा रुग्णालयात कोरोना नियमाकडे पाठ

तिसऱ्या लाटेचा धोका..जिल्हा रुग्णालयात कोरोना नियमाकडे पाठ

परभणी : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी जिल्हा रुग्णालयात कोरोना नियम रुग्ण व नातेवाईकांकडून फारसे गांभिर्याने पाळले जात नाही. यामुळे जिल्‍हा रुग्णालयातूनच तिसऱ्या लाटेचा धोका संभवला जात आहे. (parbhani-news-coronavirus-third-wave-back-to-the-corona-rule-in-the-civil-hospital)

जिल्‍हा रुग्णालयात येणारे रूग्‍ण व त्‍यांचे नातेवाईक यांच्‍याकडून फिजिकल डिस्‍टसिंगकडे दुर्लक्ष केले जाते. तसेच रुग्ण व नातेवाईक मास्क न घालत रूग्णालयात वावरत असून याकडे रूग्णालय प्रशासन देखील गांभीर्याने पाहत नाही. यामुळे कोरोनाची तिसरी लाट कशी रोखणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

अगोदरच आजारांची साथ

परभणी जिल्हा सामान्य रूग्णालयात जिल्हाच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण व नातेवाईक उपचारासाठी येतात. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. त्यात डेंग्‍यू, मलेरिया, चिकनगुनीया या आजारांची साथ पसरली आहे. यामुळे रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. हजारोच्या संख्येने रुग्ण व नातेवाईक रूग्णालयात येत आहेत.

Parbhani civil hospital
पाचशे कोटी भेट नसून हा तर आमचाच थकलेला पगार..एसटी संघटनांची तीव्र प्रतिक्रीया

मग तिसरी लाट रूग्णालयातूनच?

तिसऱ्या कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगली जात आहे. तर दुसरीकडे मात्र जिल्हा रुग्णालयात कोरोना नियमाचा फज्जा उडविला जात आहे. तिसऱ्या लाटेला रोखणार कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रुग्ण नातेवाईक सोशल डिस्‍टसिंग, मास्क न घालता रुग्णालयात वावरत आहेत. याकडे रूग्णालय प्रशासन दुर्लक्ष करत असून बघ्यांची भूमिका घेत आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com