उसाचा भुसा घेऊन जाणारा ट्रॅक्टर नदीच्या पुलावर पलटी; परळी- अंबाजोगाई वाहतूक विस्कळित

हा अपघात परळी शहरापासून अवघ्या ४ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कण्हेरवाडी परिसरात सकाळच्या सुमारास घडली
उसाचा भुसा घेऊन जाणारा ट्रॅक्टर नदीच्या पुलावर पलटी; परळी- अंबाजोगाई वाहतूक विस्कळित
उसाचा भुसा घेऊन जाणारा ट्रॅक्टर नदीच्या पुलावर पलटी; परळी- अंबाजोगाई वाहतूक विस्कळितविनोद जिरे

बीड : ऊसाचा भुसा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्राली नदीच्या पुलावर पलटी झाल्याने, बीडच्या परळी- अंबाजोगाई महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. हा अपघात परळी शहरापासून अवघ्या ४ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कण्हेरवाडी परिसरात सकाळच्या सुमारास घडली आहे. तर यामुळे जवळपास 2 तास प्रवाशांना ताटकळत बसण्याची वेळ आली होती. उसाचा भुसा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ड्रायव्हरला वळण रस्त्याचा अंदाज न आल्याने, ट्रॉली पलटी झाली आहे.

हे देखील पहा-

यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. जेसीबीच्या साह्याने ट्रॉली मधील भुसा बाजूला काढून ट्रॉली सरळ करण्याचे काम चालू आहे. यावेळी घटनास्थळी परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी वेळेत दाखल होऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. यावेळी वाहतुक देखील जवळपास २ तास विस्कळीत झालेली होती. याचा फटका म्हणून वाहनांच्या तब्बल १ किलोमीटरपर्यंत लांबच- लांब रांगा लागून प्रवाशांचे हाल झाले आहे.

उसाचा भुसा घेऊन जाणारा ट्रॅक्टर नदीच्या पुलावर पलटी; परळी- अंबाजोगाई वाहतूक विस्कळित
Ahmednagar: सात दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळले

दरम्यान परळी शहरापासून अवघ्या ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या, कन्हेरवाडी गावापरिसरात नदीवरील पुलाचे काम अर्धवट आहे. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास भोगावा लागत आहे. यामध्ये भर म्हणून पावसाळ्यात महामार्गावर मुरूम टाकल्यामुळे, पाणी साचून चिखलामुळे दुचाकी स्लीप होऊन अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे तात्काळ पुलाचे अर्धवट काम पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com