परळीची लेक म्हणून माझ्यासाठी ही दुःखाची गोष्ट आहे- प्रीतम मुंडेंचा सरकारवर निशाणा

बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असणाऱ्या, भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी, राज्य सरकारवर चांगलीच टीका केली
परळीची लेक म्हणून माझ्यासाठी ही दुःखाची गोष्ट आहे- प्रीतम मुंडेंचा सरकारवर निशाणा
परळीची लेक म्हणून माझ्यासाठी ही दुःखाची गोष्ट आहे- प्रीतम मुंडेंचा सरकारवर निशाणाविनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असणाऱ्या, भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी, राज्य सरकारवर चांगलीच टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, राज्य सरकारकडे काही मागावं एवढी सुद्धा अपेक्षा आता जनतेची राहिली नाही. मी राज्यात विरोधी पक्षाची खासदार असल्यामुळे, माझ्यासाठी राजकीय दृष्ट्या ही आनंदाची जरी बाब असली, तरी बीडची लोकप्रतिनिधी आणि परळीची लेक म्हणून, ही निश्चितचं दुःखाची गोष्ट आहे.

हे देखील पहा-

जर तुमच्याकडे सर्वसामान्य जनतेची मागण्याची जर अपेक्षा संपली असेल, तर हे सरकार किती खाली जात आहे हे लक्षात येतं. अशी खरमरीत टीका आणि खंत भाजप खा. प्रीतम मुंडेंनी सरकारवर यावेळी केली आहे. त्या बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाच्या पहाणी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्या म्हणाल्या की, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे 100 टक्के नुकसान झाले आहे. मात्र, दुर्दैवाची गोष्ट आहे की राज्य सरकार, म्हणावं तेवढं याकडे गंभीरपणे बघत नाही.

२ वर्षांपूर्वी शेतकरी हा राज्य आणि केंद्र सरकारवर खुश होता. मात्र, आज शेतकऱ्यांना अनुदान नाही, कुठलं नुकसान नाही, केवळ केंद्र सरकारची शेतकरी सन्मान योजनाची राशी मिळत आहे.आता परळीतील लोक शहाणे झाले आहेत. की त्यांच्या अपेक्षा खुंटल्या आहेत? हे मला काही कळेना, मला लोक म्हणतात, की "ताई तुम्ही केंद्र सरकार कडून अतिवृष्टीकरिता काही मदत आणा" म्हणजे राज्य सरकारकडे काही मागावी एवढी अपेक्षा देखील जनतेची राहिली नाही.

परळीची लेक म्हणून माझ्यासाठी ही दुःखाची गोष्ट आहे- प्रीतम मुंडेंचा सरकारवर निशाणा
विद्यापीठातील क्रीडासंकुलाला खाशाबा जाधव यांचे नाव...

त्यामुळे मी राज्यात विरोधी पक्षाची खासदार असल्यामुळे, माझ्यासाठी राजकीय दृष्ट्या ही आनंदाची जरी बाब असली. तरी देखील बीडची लोकप्रतिनिधी आणि परळीची लेक म्हणून ही निश्चितचं दुःखाची गोष्ट आहे. जर तुमच्याकडे सर्वसामान्य जनतेची मागण्याची जर अपेक्षा संपली असेल, तर हे सरकार किती खाली जात आहे, हे लक्षात येतं. अशी टीका खासदार प्रीतम मुंडेंनी यावेळी व्यक्त केली आहे. त्यांनी परळी तालुक्याच्या गोदाकाठ परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची पहाणी केली आहे.

ममदापूर, बोरखेड, तेलसमुख, रामेवाडी, कासारवाडी, पोहणेर या ठिकाणी नुकसानीची पाहणी करत असताना, त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद देखील साधला आहे. दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा शासन दरबारी मांडून त्यांच्या मागण्यांचा आम्ही शासन स्तरावर पाठपुरावा करणार आहोत. जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी. याकरिता आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. असा विश्वास देखील त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.