गल्लीतील रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी परळीकरांनी लावले चक्क बॅनर !
गल्लीतील रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी परळीकरांनी लावले चक्क बॅनर !विनोद जिरे

गल्लीतील रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी परळीकरांनी लावले चक्क बॅनर !

फक्त मतं मागायला येता...ओ...शेठ... तुम्ही नादच केला थेट.....असा आहे बॅनरवर उल्लेख

बीड: अनेकवेळा मागणी करून देखील नगरपालिका प्रशासनाने दखल न घेतल्याने, परळीकरांनी अनोख्या स्वरूपातून मागणी केली आहे. गल्ली आणि कॉलनीतील रखडलेल्या रस्त्यांचे काम करून घेण्यासाठी, परळीकरांनी चक्क नगरपालिका प्रशासनासह सत्ताधाऱ्यांना, बॅनरबाजी करत काम करून देण्याची विनंती केली आहे. या मागणीचे फ्लेक्स नागरिकांनी शहरात लावले आहेत

शहरात सुरू असलेल्या अंतर्गत गटार योजनेचेच्या कामामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. या कामामुळे काही जण जखमीही झाले आहेत. 110 कोटी रुपये बजेट असलेल्या भुयारी गटार योजना आणि मलनिस्सारण प्रकल्प कामामुळे परळीतील रस्त्यांची अक्षरशः चाळणी होऊन बसली आहे.

गल्लीतील रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी परळीकरांनी लावले चक्क बॅनर !
अनिल देशमुखांच्या घरी पुन्हा ईडीचा छापा

शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेले सुर्वेश्वर नगर भागात, गेल्या वर्षभरापासून अंतर्गत गटार योजनेसाठी रस्ता उखडून ठेवला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना चालणेही मुश्कील झाले असून पावसाळ्यामुळे या भागात पाणी साचत आहे. याला कंटाळत या परिसरातील नागरिकांनी थेट बॅनर लावतचं आपला पालिका प्रशासनाविरुद्धचा रोष व्यक्त केला आहे. फक्त मतं मागायला येता...ओ...शेठ... तुम्ही नादच केला थेट, सर्वेश्वर नगरचा रस्ता झालाच पाहिजे. असे त्या बॅनर वरील मजकूर आहे.

शिवाय गाव भागातील नागरिक तळावर जाण्यासाठी या मधल्या मार्गाचा वापर नागरिक करत असतात. मात्र या रस्त्यात गेल्या सहा महिन्यापासून खडीचा डोंगर रचल्याने, सोपा रस्ता असतानाही नागरिकांना लांबच्या रस्त्याने जावे लागत आहे. याकडे या प्रभागातील नगरसेवक आणि नगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. नगरपालिकेच्या गलथान कारभाराला कंटाळत नागरिकांनी आपला राग व्यक्त करत आता थेट बॅनर लावल्यावर तरी नगरपालिका प्रशासन नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देणार का ? अशी चर्चा परिसरात होत आहे.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com