काल लंके आणि आज ज्योती देवरे यांनी घेतली अण्णा हजारेंची भेट

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली.
काल लंके आणि आज ज्योती देवरे यांनी घेतली अण्णा हजारेंची भेट
काल लंके आणि आज ज्योती देवरे यांनी घेतली अण्णा हजारेंची भेटसचिन अगरवाल

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. ज्योती देवरे यांनी अण्णा हजारे यांना राखी बांधली व तुमचे आशीर्वाद मला असू द्या अशी विनंती केली.

हे देखील पहा -

ज्योती देवरे यांची आत्महत्येचा इशारा देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी एका लोकप्रतिनिधीकडून आपल्याला त्रास होत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा संपूर्ण रोख हा राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्याकडे होता.

काल लंके आणि आज ज्योती देवरे यांनी घेतली अण्णा हजारेंची भेट
आदिवासी पाड्यावर झाडांना राखी बांधून साजरे झाले रक्षाबंधन

या संपूर्ण नाट्यानंतर आमदार निलेश लंके यांनी अण्णा हजारे यांची काल भेट घेतली होती. आणि आज तहसीलदार ज्योती देवरे यांनी देखील अण्णा हजारे यांची भेट घेतली आहे. यावेळी "खचून जाऊ नका, अपमान सहन करण्याची ताकद ठेवा, आत्महत्येचा विचार करणे योग्य नाही तो डोक्यातून काढून पुढील वाटचाल करा" असा सबुरीचा सल्ला अण्णा हजारे यांनी ज्योती देवरे यांना दिला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.