प्रवाशांनो महाडकडे जाणे टाळा !

अतिवृष्टीमुळे मुंबई गोवा महामार्ग बंद करण्यात आला असून, महाडमध्ये महामार्गावर पाणी जमा झाले आहे. प्रवाशांनी महाड कडे जाण्याचे टाळावे असे आवाहन रायगड जिल्हा पोलिस अधीक्षकांनी केले आहे.
प्रवाशांनो महाडकडे जाणे टाळा !
प्रवाशांनो महाडकडे जाणे टाळा !राजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर

रायगड : रायगड जिल्ह्यात महाड, पोलादपूर तालुक्याला अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. महाड, पोलादपूर तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाल्याने मुंबई गोवा महामार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.

हे देखील पहा -

माणगाव येथेच महाड कडे जाणारी वाहतूक थांबविण्यात येत आहे. महाड कडे जाणारी वाहतूक माणगाव निजामपूर ताम्हणी घाटातून पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. रत्नागिरीकडे जाणारा आंबे घाट रस्ता देखील वाहतुकीस बंद करण्यात आलेला आहे.

प्रवाशांनो महाडकडे जाणे टाळा !
अकोल्यातील पठार नदीला आलेल्या पुरात एक जण वाहून गेला

महाडकडे जाणाऱ्या प्रवाशांनी पुढे जाऊ नये असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी केले आहे. माणगाव येथे पोलीस वाहनांना थांबवून दुसऱ्या मार्गाने पाठवण्यात येत आहे. पाऊस थांबल्यास दोन तीन तासात पाणी ओसरेल असे देखील त्यांनी नमूद केले.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com