Godavari Express : गोदावरी एक्सप्रेस मनमाडहूनच साेडा; चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांची मागणी

मनमाड-नाशिकचे विद्यार्थी, नोकरदार हे रोज याच गाडीने जातात. त्यामुळे ही गाडी मनमाड येथून सुटावी अशी मागणी चाकरमान्यांसह प्रवाशांची आहे.
godavari express, manmad, dhule
godavari express, manmad, dhulesaam tv

- अजय सोनवणे

Nashik News : मनमाड येथून सुटणारी गोदावरी एक्सप्रेस काेरोना काळात बंद करण्यात आली हाेती. काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर याच गाडीला मनमाड-मुंबई समर स्पेशल (manmad mumbai summer special train) असे नाव देण्यात आले आहे. (Maharashtra News)

godavari express, manmad, dhule
Tomato Price Drop : बाजार समितीत टोमॅटोला कवडीमाेल दर, शेतकरी चिंतेत; सरकारकडून मदतीची अपेक्षा

आता ही गाडी थेट धुळे (dhule) येथून सोडण्याचा घाट घातला जात आहे. या नव्या निर्णयामुळे चाकरमान्यांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आठवड्यातील सातही दिवस ही गाडी धुळे येथून सोडण्यात येणार असल्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

godavari express, manmad, dhule
Pankaja Munde - Udayanraje भेट : असं काय घडलं साता-यात पंकजा मुंडेंनी उदयनराजेंची कान पकडून मागितली माफी

हा निर्णय घेताना मनमाड, नाशिकहून गाडीला पुरेसे प्रवाशी (passengers) व तिकीटातून महसूल मिळत नसल्याच कारण देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे थेट धुळ्याहून गाडी सोडण्यात येणार असल्याने मनमाडकरांची एक हक्काची गाडी पुन्हा परजिल्ह्यातून सोडली जाणार असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

godavari express, manmad, dhule
Aanna Hazare News : केवळ सरकारच नव्हे विराेधकांनी देखील 'याचा' विचार करावा : अण्णा हजारे

प्रवाशांनी साम टीव्हीशी बाेलताना ही गाडी मनमाड येथून सकाळी साडेआठ वाजता सुटत असल्याने मनमाड, येवला, नांदगाव, मालेगाव येथील प्रवाशांना फायदा होत असताे. मनमाड ते मुंबई केवळ 110 रुपये तिकीट असल्याने प्रवाशी जास्त असतात.

मनमाड-नाशिकचे विद्यार्थी, नोकरदार हे रोज याच गाडीने जातात. त्यामुळे ही गाडी मनमाड येथून सुटावी अशी मागणी चाकरमान्यांसह प्रवाशांची आहे. विशेष म्हणदे रोज अपडाऊन करणारे चाकरमानी याच गाडीत गेल्या 25 वर्षांपासून गणेशाची 10 दिवस स्थापना देखील करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com