सातारा काेल्हापूर पॅसेंजर सुरु करा; रेल्वे प्रवाशांची मागणी

passenger train
passenger train

सातारा : काेविड १९ चा प्रादुर्भाव राेखण्यासाठी रेल्वे विभागाच्या माध्यमातून टप्प्याटप्याने केवळ लांब पल्याच्या गाड्या सुरु करण्यात आले आहेत. या सर्व गाड्या एक्सप्रेस आहेत. परंतु सर्व सामान्यांना तिकीट दरात परवडेल आणि नियमीत प्रवास करणा-यांचे पॅसेजर गाड्या passenger train मात्र बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. यामुळे प्रवाशांना नाहक भुर्दंड बसत आहे.

सातारा काेल्हापूर पॅसेंजर, काेल्हापूर - पुणे पॅससेंजर याबराेबरच मिरज - बेळगाव पॅसेंजर या तिन्ही पॅसेंजर रेल्वेतून नित्यनेमाने माेठ्या संख्येने प्रवासी प्रवास करीत असतात. परंतु या गाड्या बंद असल्याने कामगार वर्गास ही आर्थिक भार साेसावा लागत आहे.

passenger train
'...तर राष्ट्रवादीच्या मंडळींना तोंड लपवून बसण्याची वेळ येईल'

काेल्हापूर तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेस, काेल्हापूर गाेंदिया एक्सप्रेस (महाराष्ट्र एक्सप्रेस), काेल्हापूर मुंबई एक्सप्रेस (महालक्ष्मी), काेयना एक्सप्रेस, गाेवा - निजामुद्दीन एक्सप्रेस, यशवंतपूर - अहमदाबाद एक्सप्रेस, मिरज - बंगळरु एक्सप्रेस (राणी चेन्नम्मा), यशवंतपूर-अजमेर, हुबळी दादर या एक्सप्रेस सुरु आहेत.

सध्या मिरज रेल्वे स्थानकातून काेल्हापूरला जाण्यासाठी ६० रुपये द्यावे लागत आहे. पॅसेंजर सुरु झाल्यास ४५ रुपयांची बचत हाेणार आहे असे प्रवाशांचे म्हणणे आहे. त्यातच मुंबईत लाेकल सुरु झाल्या आहेत मग पॅसेंजर सुरु करण्यास काय हरकत आहे असा प्रश्न प्रवासी समाज माध्यमातून रेल्वे विभागास करीत आहेत.

काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव राेखतानाच रेल्वेने प्रवाशांसाठी सर्व प्रकारची काळजी घेत एक्सप्रेस गाड्या सुरु केल्या आहेत. पॅसेंजर गाड्यांबाबत अद्याप पर्यंत काेणताच निर्णय आला नसल्याने त्या बंद आहेत. संबंधित गाड्या सुरु करण्याचे आदेश मिळताच त्या देखील सुरु हाेतील अशी माहिती जनसंपर्क अधिकारी मनाेज झंवर यांनी माध्यमांना दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com